कै.विठ्ठलरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्रदान
कन्हेरगाव(प्रतिनिधी)
अंबाड तालुका माढा येथील कै.विठ्ठलरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय याप्रशालेस 2022-23 वर्षाचा स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी प्राप्त झाला असुन या पुरस्काराचे वितरण समाज कल्याण केंद्र सभागृह, रंगभवन चौक ,सोलापूर येथे शिक्षण विभाग, सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्रमाणपत्र सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सोलापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त शिक्षणाधिकारी व ज्येष्ठ मराठी लेखक योगीराज वाघमारे (शालेय पाठ्य पुस्तकातील *बेगड* या कथेचे लेखक) उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशालेतील सर्व शिक्षकांचे जिल्हा परिषद सोलापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अभिनंदन केले तसेच आमदार बबनदादा शिंदे, संस्थेचे संस्थापक चेअरमन आमदार संजय मामा शिंदे,दुध संस्थेचे चेअरमन रणजित भैय्या शिंदे, सभापती विक्रमदादा शिंदे,माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा विठ्ठलगंगा फार्मस प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन धनराज दादा शिंदे,निमगाव(टें) गावचे सरपंच यशवंत भैय्या शिंदे, संस्थेचे सचिव राजेंद्र ठोंबरे सर यांनी प्राचार्य रजपूत सर सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा