माईलस्टोन पब्लिक स्कूलचे राष्ट्रीय हापकीडो बॉक्सिंग स्पर्धेत यश.
कुर्डूवाडी/ प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत माईलस्टोन पब्लिक स्कूल कुर्डुवाडी चे चार खेळाडू राष्ट्रीय पदकाचे मानकरी ठरले आहेत.
या मध्ये आर्या महावीर घोडके -(सुवर्णपदक)अथर्व हनुमंत चव्हाण (रौप्य पदक) ,ओम प्रशांत त्रिंबक- (रौप्य पदक) ,श्रेया शिवाजी गवळी हिलारौप्य पदक मिळाले आहे
देशभरातुन विविध राज्यातून आलेल्या खेळाडू मध्ये माईलस्टोन पब्लिक स्कूल कुर्डुवाडी च्या खेळाडूंनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे देशात महाराष्ट्राचे नाव उंचावले, महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले .खेळाडूंना शिंदे सर गोडसे सर, जाधव सर साळवी सर यांनी मार्गदर्शन केले .
विजयी खेळाडूंचे संचालिका सौ.राणी जाधव , मुख्याध्यापिका नागरे ,संस्थेचे अध्यक्ष ॲड.आप्पासाहेब जगताप, अमोल काळे, साळवे, बोधले व इतर सर्व शिक्षक - शिक्षिका यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो-राष्ट्रिय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत यश संपादन केलेले माईल स्टोन पब्लिक स्कूलचे यशस्वी विद्यार्थी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा