Breaking

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत स्वांतत्र्यांचा अमृत महोत्सव- हर घर झेंडा उपक्रमांतर्गत कामगारांना मोफत झेंडा वाटप



विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत स्वांतत्र्यांचा अमृत महोत्सव- हर घर झेंडा उपक्रमांतर्गत कामगारांना मोफत झेंडा वाटप


भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याचे पार्श्वभुमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य स्मृती तेवत रहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी या उद्देशाने 13 ते  15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र व राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार हर घर झेंडा हा  उपक्रम राबविण्यात येत असल्याने या उपक्रमातंर्गत विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील कामगारांना कारखान्यामार्फत मोफत झेंडे वाटप करण्यात आल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

 

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या  कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय/निमशासकीय/खाजगी आस्थापना/सहकारी संस्था/शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी हर घर झेंडा अंतर्गत करणेबाबत मा.साखर आयुक्त,पुणे, प्रादेशिक सहसंचालक(साखर),सोलापूर व इतर शासकीय कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे. तसेच कारखान्यातील कर्मचारी यांना झेंड्याचे वाटप करणेबाबत सुचना देण्यात आलेले आहेत. त्यानुसार कारखान्यामार्फत युनिट नं.1 व 2 कडील सर्व कर्मचारी यांना एकूण 2 हजार मोफत झेंडे वाटप करण्यात आले असलेबाबत सांगितले. तसेच हर घर झेंडा उपक्रमा अंतर्गत राष्ट्रध्वज लावणेबाबत केंद्र व राज्य शासनाने  दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणेबाबत कामगारांना आवाहन करण्यात आलेले आहे अशी माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

 

सदरप्रसंगी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, युनिट नं.2 चे जनरल मॅनेजर एस.आर.यादव, युनिट नं.1 चे वर्क्स मॅनेजर ए.डी.ढेकाने, जनरल मॅनेजर प्रोसेस पी.एस.येलपले, केन मॅनेजर एस.पी.थिटे, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल, परचेस ऑफिसर जे.डी देवडकर, सुरक्षा अधिकारी एफ.एम.दुंगे युनिट नं.2 चे चिफ इंजिनिअर एस.एस.महामुनी, चिफ केमिस्ट बी.जे. साळुंखे, शेतकी अधिकारी बी.डी.इंगोले, कामगार प्रतिनिधी अनिल वीर व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा