उमरा ग्रामपंचायतच्यावतीने तिरंगा ध्वज वाटप
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा : लोहा तालुक्यातील उमरा ग्रामपंचायत व तहसील कार्यालयाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त सर्व गावकऱ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.तसेच दिलेल्या तिरंगा प्रत्येकाने आपल्या घरी लावावा,असे आवाहनही ग्रामपंचायत व तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.
आझादी का अमृत महोत्सवानिमित्त लोहा तालुक्यातील उमरा ग्रामपंचायत येथे हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत शुक्रवार दि.१२ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात प्रामुख्याने गावकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरा व जि.प.प्रा.वस्ती शाळा रामजी आंबेडकर नगर उमरा येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान प्रभात फेरी काढण्यात आली.
मौजे.उमरा सज्जाच्या तलाठी पुजाराणी कुंटूरकर व ग्रामविकास अधिकारी मंगनाळीकर यांनी उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन करत दिलेल्या तिरंगा झेंडा प्रत्येकाने आपल्या घरावर लावून देशाभिमान राखावा,असे आवाहन केले.
यावेळी तलाठी पूजाराणी कुंटुरकर,ग्रामविकास अधिकारी एस.ए.मंगनाळीकर ,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक एम.डी. सिरसाट,व्ही. व्ही.अमनवाड,एम. जी.मेथे,मारोती पवळे,मुबिन शेख गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका गावकरी महिला आदींची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा