Breaking

बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

नलिनी लेखन कौशल्य नोट्स पुस्तकाचे प्रकाशन


नलिनी लेखन कौशल्य नोट्स पुस्तकाचे प्रकाशन 



कन्हेरगाव(प्रतिनिधी)
  दि.15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कै.विठ्ठलरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंबड, ता.माढा येथील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक अजित  क्षीरसागर सर यांनी लिहिलेल्या Nalini Writing Skill Notes या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रचंड यशानंतर दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन कॉलेजचे प्राचार्य रजपूत सर यांच्या शुभ हस्ते अगदी आनंदी वातावरणात करण्यात आले. तसेच क्षीरसागर सरांच्या पुढील कार्यास संस्थेचे सचिव माननीय राजेंद्र ठोंबरे सर आणि प्राचार्य रजपूत सर तसेच प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री पाटील सर ,कॉलेज विभाग प्रमुख  घाडगे सर यांनी क्षीरसागर सरांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अंबड गावचे सरपंच, उपसरपंच तसेच इतर मान्यवर मंडळी ,ग्रामस्थ सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत अकरावी आणि बारावीच्या इंग्रजी विषयाच्या writing skill चे पुस्तक  क्षीरसागर सरांनी लिहिले आहे.या पुस्तकाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा. हे पुस्तक पाहिजे असल्यास क्षीरसागर सरांच्या 9022478162 या नंबर वरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा