Breaking

बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२

श्री स्त्री शक्ती महिला मंडळ यांच्या वतीने नागपंचमी उत्सव साजरा


श्री स्त्री शक्ती महिला मंडळ यांच्या वतीने नागपंचमी उत्सव साजरा   


                          

    टेंभुर्णी प्रतिनिधी:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त कै.सुशिलाबाई पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित श्री. स्त्री शक्ती महिला मंडळ आयोजित भव्य नागपंचमी उत्सव टेंभुर्णी शहरात ओम साई मंगल कार्यालय येथे २ ऑगस्ट रोजी साजरा झाला. कार्यक्रम स्थळी प्रमुख पाहुणे माननीय  तांबे मॅडम ,श्री स्त्री शक्ती महिला मंडळाचे अध्यक्ष श्रीमती शीलाताई पाटील, उपाध्यक्ष सुवर्णा भोसले व सचिव .सविता जगताप मॅडम उपस्थित होत्या. टेंभुर्णी शहरातील विविध शाळेतील दहावीच्या परीक्षेतील गुणवंत २१ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला .

करकंब येथील जोगेश्वरी महिलांच्या ग्रुपने सुंदर अशी गवळण सादर केली. कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या त्यामध्ये  श्रावण महिन्यातील सण व त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन यावर निबंध स्पर्धा, वेशभूषा करून  वक्तृत्व स्पर्धा, विविध खेळ झिम्मा , घसर फुगडी,फुगडी  काटवट खाना , घागर फुकणे,सुप खेळणे,उखाणे, संगीत खुर्ची, जात्यावरच्या ओव्या, खिस बाई खिस.असे खेळ घेण्यात आले त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला .सर्व महिलांनी कार्यक्रमात सहभागी होऊन उत्साहाने व आनंदाने कार्यक्रम पार पाडला.
 श्री.स्त्री शक्ती महिला मंडळाचे सदस्य -जयश्रीताई येवले पाटील, वैशाली शिंदे , पल्लवी पाटील, सुषमा टकले, शीलाताई गायकवाड, सुनिता सोनवणे, सुप्रिया भोसले ,निशिगंधा मस्के, नंदा मोरे ,कुसुम फाळके, मनीषा येवले पाटील ,अंजली अरगडे,  कुसुम लोंढे, डॉ. स्मिता भोसले,कुसुम रेकटे ,हेमा चौधरी, आशा गुळवे, आश्लेषा येवले पाटील, रूपाली येवले पाटील, मनिषा भोसले ,भाग्यश्री पाटील, जयश्री तांबे ,अंजली कांबळे, प्रभावती यादव आदी महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा