Breaking

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

माहिती अधिकार पत्रकार संरक्षणमहासंघाची विभागीय बैठक संपन्न.मराठवाडा उपाध्यक्षपदी प्रा सोमनाथ स्वामी, जिल्हाध्यक्ष किशोर नागिमे, शहराध्यक्ष कार्तिक भुरे यांची निवड .*

*माहिती अधिकार पत्रकार संरक्षणमहासंघाची विभागीय बैठक संपन्न.मराठवाडा उपाध्यक्षपदी प्रा सोमनाथ स्वामी, जिल्हाध्यक्ष किशोर नागिमे, शहराध्यक्ष कार्तिक भुरे यांची निवड .*


*लातूर :प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सूर्यवंशी* .

गत पाच वर्षांपासून माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ कार्यरत असून त्या मार्फत जनतेच्या न्याय व हक्कासाठी अहोरात्र कार्य करणारी तसेच माहिती अधिकार आणि पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना येणाऱ्या अडचणीला वाचा फोडणारी माहिती अधिकार ही चळवळ सशक्त  करण्यासाठी पक्षप्रमुख अभिजित आपटे, व संस्थापिका सौ अमृताताई भंडारी, राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश मुळीक, राज्यधयक्ष सलिम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर महासंघ गतीने कार्य करीत असून या संघटनेची विभागीय बैठक ही नुकतीच लातूर येथे पार पाडली, 
      या महासंघाच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी प्रा सोमनाथ स्वामी डिगोळकर, लातूर जिल्हाध्यक्षपदी किशोर नागिमे, शहराध्यक्षपदी कार्तिक भुरे यांच्या निवड यावेळी घोषित करण्यात आल्या, 
   यावेळी माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोतराव सावंत, पचछीम पचछीम महाराष्ट्र उपाध्यक्ष हेमंत जाविर, उमेश चावरे, सोलापूर जिल्ह्याधयक्ष बाबासाहेब शिंदे, माढा तालुकाध्यक्ष सचिन परबत, बेळगावचे संभाजी खांडेकर, बीड जिल्ह्यासचिव विजय पारखे, शहराध्यक्ष रतन कोठावळे, केजचे दिलीप काळे, लातूरचे शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शेळके, जेष्ठ शिवसैनिक त्रयबक स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती, 
   यावेळी महासंघाचे कार्य, सेवा, हेतू, उद्देश काय आहे व ही सामाजिक चळवळीची संघटना,सामान्य मानसाला कसा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते याबाबत शिंदे यांनी सखोल मार्गदर्शन केले, यावेळी मारोती सांवत व प्रा सोमनाथ स्वामी डिगोळकर आपले मनोगत व्यक्त केले, 
  यावेळी सदर महासंघाचे कार्य गती करण्यासाठी प्रा सोमनाथ स्वामी डिगोळकर, किशोर नागिमे, कार्तिक भुरे यांच्या निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते यावेळी देण्यात आले, याप्रसंगी शिवाजी गंगणे, विश्वेशवर मुचाटे, राजेंद्र कानवडे, आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा