युवासेना लोहा शहराध्यक्षपदी महेश पाटील चव्हाण यांची नियुक्ती
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा : नुकत्याच लोहा-कंधार युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून युवासेना शहर प्रमुखपदी महेश चव्हाण निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे,युवासेना सचिव वरुण सरदेसाई,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रोहिदासजी चव्हाण,युवानेते नवनाथ बापू चव्हाण व युवासेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख गजानन पाटील कदम यांनी लोहा/कंधार युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.त्यात युवासेना लोहा शहर प्रमुखपदी महेश चव्हाण निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, दिगंबर पाटील हिलाल, मधुकर कदम,ज्ञानेश्वर नवघरे,भीमराव पाटील शिंदे (मा.सरपंच हळदव),सामाजिक कार्यकर्ते भारत पाटील पवार,सतीश पाटील चव्हाण सुजित पाटील चव्हाण,सतीश सूर्यवंशी,अमोल पाटील चव्हाण, सूर्यकांत चव्हाण शैलेश चव्हाण,पंकज पाटील चव्हाण,विठ्ठल शिंदे, दीपक पाटील चव्हाण, हनुमंत पाटील चव्हाण,मुकुल पाटील पवारअंकुश पवार,सचिन कल्याणकर,निलेश पाटील चव्हाण,सुदर्शन पाटील चव्हाण, अजय पाटील चव्हाण रमेश भगनुरे सुनील शेटे,बबलू कांजले,अजय पाटील लुंगारे यांसह असंख्य युवा मित्र,युवासैनिक व शहरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा