खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मानेगावात आढावा बैठक
विविध गावातील नागरिकांनी दिली निवेदने ; खासदारांचे पाठपुरावा करण्याचे आश्वासन
AJ24Taas News साठी रेणुका रजपूत माढा प्रतिनिधी
-माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शुक्रवारी 19 ऑगस्ट रोजी माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गटातील नागरिक व विविध विभागांचे अधिकारी आणि संघटनांचे पदाधिकारी यांची आढावा बैठक घेतली.यावेळी ठिकठिकाणच्या नागरिकांनी दिलेली विविध मागण्यांची निवेदने स्वीकारून त्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करून भविष्यात ते प्रश्न व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी खासदारांना विविध ठिकाणचे खराब रस्त्यांचे डांबरीकरण, शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या,पाणंद रस्ते, विजेची समस्या, माढा स्टेशन जवळील रेल्वे गेट येथे उड्डाणपूल उभारणे, मानेगाव उपसा सिंचन योजना, पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देणे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर भत्ता तातडीने मिळवून देणे,शेतकऱ्यांना रासायनिक खते व बी-बियाणे यावर भरीव अनुदानाची तरतूद करणे,सीना नदीवर आवश्यकतेनुसार बँरेजेस व सिमेंट बंधारे बांधणे आदी मागण्यांची निवेदने खासदारांना देण्यात आली. यावेळी ठिकाणच्या ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचला,अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर खासदार आल्यामुळे लोकांना फार मोठ्या अपेक्षा होत्या परंतु प्रत्यक्षात नुसती आश्वासनेच ऐकायला मिळाल्याच्या भावना काही जणांनी व्यक्त केल्या. यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना जनतेची व शेतकऱ्यांची कामे वेळेवर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जी निवेदने स्वीकारली होती त्यांचा पाठपुरावा करून भविष्यात टप्प्याटप्प्याने ते प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही खासदारांनी दिली.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मानेगाव येथे आढावा बैठकीसाठी दुपारी बारा वाजता येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले होते परंतु प्रत्यक्षात ते चारच्या सुमारास आल्याने वाट पाहत थांबलेल्या नागरिकांची गैरसोय व तारांबळ उडाली.खासदारांना पुढील नियोजित बैठकीसाठी जायचे असल्याने ते पुरेसा वेळ थांबू न शकल्याने काही जणांकडून नाराजी व्यक्त झाली.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील,संतोष पाटील, सुरेश अंबुरे,शिवाजी कांबळे, तालुकाध्यक्ष योगेश बोबडे,जयकुमार शिंदे,माया माने,संध्या कुंभेजकर,शरद झेंडे,भारत पाटील,दत्तात्रय मोरे, राजकुमार पाटील,जयसिंग ढवळे, सुभाष इंदलकर,विलास देशमुख, शितल जोकर,विश्वजीत पाटील, अनिल भेंडकर,बिरुदेव शेळके,आलम जमादार,दिपक देशमुख,अमोल नाईकवाडी,सत्यवान लटके,बालाजी नाईकवाडे,अमोल देशमुख, अर्जुन माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक,तलाठी, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
फोटो ओळी -मानेगाव ता.माढा येथे आढाव बैठकीच्या प्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, संतोष पाटील व इतर मान्यवर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा