Breaking

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

कुर्डुवाडी शहरातील रहिवासी आनंद भिवरे साहेब यांचे दिर्घकालीन आजाराने दु:खद निधन झाले. बक ऑफ महाराष्ट्र, निमगाव मध्ये लिपीकम्हणून कामांवर हजर



कुर्डुवाडी 


कुर्डुवाडी शहरातील रहिवासी आनंद भिवरे साहेब यांचे दिर्घकालीन आजाराने दु:खद निधन झाले.बॅक ऑफ महाराष्ट्र, निमगाव मध्ये लिपीकम्हणून कामांवर हजर झाले होते.आपल्या आयुष्यातील जवळ जवळ सर्व सेवा त्यांनी निमगाव शाखेतच घालवली होती.ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या बॅकेतील विनम्र आणि सहकार्य भावनेच्या सेवेने प्रभावीत केले होते.भिवरे साहेब या नावानेच ते सर्वंत्र परिचयाचे होते.
        त्यांच्या बॅकेतील अखेरच्या सेवेत कुर्डुवाडी शहरात बॅक ऑफ महाराष्ट्रची शाखा स्थापन करण्यात त्यांचें विशेष योगदान आहे... त्यांच्या अथक प्रयत्नानंतर व परिश्रमाने कुर्डुवाडीत शाखा स्थापन करण्यात आली. व कुर्डुवाडीतील अग्रणी बॅक म्हणून नावारूपास आणली.कुर्डुवाडीच्या त्यांच्या प्रयत्नांनी स्थापन झालेल्या बॅकेतूनच ते अधिकरी म्हणून निवृत्त झाले.
     त्यांच्या नावाप्रमाणेच त्याचा हसरा व आनंदी, मिस्किल विनोदी सर्वांना हास्य कल्लोळात नेण्याच्या स्वभावाने विशेष परिचीत होते.त्यांनी आपल्या अनंत कौटुंबिक अडचणीवरही मोठ्या धिराने मात केली.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,मुलगी असा परिवार आहे.भिवरे कुटुंबीयांना दु:खद प्रसंगातून सावरण्याचे मनोबल ईश्वर देवो हिच प्रार्थना.भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा