Breaking

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

*श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये विविध कार्यक्रम उत्साहात पार.*



श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये विविध  कार्यक्रम उत्साहात पार.



श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल टेंभुर्णी मध्ये शनिवार दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णच्या पूजेने करण्यात आली. यानंतर स्कुलच्या चारी हाऊसने श्री कृष्णाच्या जीवनावर आधारित सुंदर लघु नाटिका प्रस्तुत केल्या.यामध्ये श्रीकृष्णाचा जन्म, श्रीकृष्णाचे बालपण, राधा -कृष्णच्या रास लीला,  श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट अशा विविध प्रकारच्या नाटकांचे मुलांकडून अत्यंत उत्तम प्रकारे सादरीकरण करण्यात आले.

वाचन करण्याची आवड निर्माण होण्यास व वाचन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या हेतुने श्री कृष्णाविषयी विविध कथा व लेखनांचे वाचनही प्रत्येक वर्गातील कांही विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच प्रस्तुत कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून स्कुलच्या प्रिंसिपल शाहिदा पठान मॅडम या लाभल्या. यामध्ये विवेकानंदाज् ब्ल्यू हाऊसने प्रथम क्रमांक मिळवला. या नंतर प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.

तसेच याच दिवशी टेंभुर्णी मधील केंद्र स्तरावर असणारी बीट स्तरीय शिक्षण परिषद ही श्री शारदेय गुरुकुलच्या इमारतीमध्ये संपन्न झाली. यामध्ये टेंभुर्णी व पंचक्रोशीतील विविध शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व पदाधिकारी यांनी प्रशालेमध्ये प्रशिक्षणासाठी हजेरी लावली. यामध्ये  श्री विजयराव लोंढे, श्री मनोज पवार, श्री भाऊराव शिंदे, श्री समीर काळे व श्री नागनाथ भोसले या केंद्रप्रमुखांच्या  मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पूर्ण झाले. शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आण्यासाठी 10 विविध प्रकारची सूत्रे (दशसूत्री कार्यक्रम) हा या प्रशिक्षणाचा मुख्य विषय होता. हा दशसूत्रीचा कार्यक्रम मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली सुव्यवस्थित पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा