वसंत सिरसाट यांना यंदाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड : प्रतिष्ठा न्यूज चे प्रतिनिधी वसंत सिरसाट यांना पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणारा सन २०२२ साठीच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.
सांगली येथील जिंदाबाद मीडिया हाऊस प्रतिष्ठा न्यूज यांच्या वतीने देण्यात येणारा पत्रकारिता क्षेत्रातील सन २०२२ मधील उत्कृष्ट कार्याबद्दलचा पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र नुकतेच वसंत सिरसाट यांना प्राप्त झाले आहे. प्रतिष्ठा न्यूजचा तिसरा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार असून या पुरस्काराचे स्वरूप हे शाल ,श्रीफळ व सन्मान चिन्ह आणि प्रमाण पत्र हे असणार आहे.
हा पुरस्कार सोहळा दि-७-ऑगस्ट २०२२ रोज रविवारी सकाळी ११ वाजता सांगली येथे मा.अजितराव घोरपडे (सरकार) (माजी पाटबंधारे मंत्री महाराष्ट्र राज्य.) माननीय खासदार संजय काका पाटील (सांगली लोकसभा) प्रा.डॉ. बाबुराव गुरव (ज्येष्ठ विचारवंत/ अध्यक्ष विद्रोही साहित्य संमेलन) मा. पृथ्वीराज (बाबा) पाटील (अध्यक्ष- सांगली जिल्हा शहर काँग्रेस कमिटी) मा. जालिंदर महाडिक ( विशेष अधिक्षक पाटबंधारे विभाग पुणे) मा. प्रा पि आर.वाघमोडे ( ज्येष्ठ साहित्यिक जत) मा.तानाजीराव जाधव (संपादक प्रतिष्ठा न्यूज सांगली ) व मा.सौ. विद्याताई जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा सांगली येथील मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन येथ संपन्न होणार आहे.
वसंत सिरसाट यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्वच क्षेत्रातुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा