शिक्षकांच्या समस्या टप्याटप्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करु - आमदार बबनराव शिंदे .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी राजेंद्र केदार
शिक्षक आमदार प्रा जयंत आसगांवकर यांनी त्यांच्या फंडातून प्रिंटर देण्याचं काम केलं आहे , त्याचा फायदा शाळेतील विद्यार्थ्यांना नक्की होईल . शिक्षकांच्या समस्या टप्याटप्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करु , असे प्रतिपादन आमदार बबनराव शिंदे यांनी केले .
बबनराव शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , अकोले खुर्द तालुका माढा येथे शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांच्या आमदार शाळा विकास निधीतून प्रिंटर वाटप कार्यक्रम आमदार बबनराव शिंदे व आमदार जयंत आसगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले .
अकोले खुर्द तालुका माढा येथे बुधवारी 3 ऑगस्ट रोजी दुपारी बबनराव शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक आमदार प्रा . जयंत आसगांवकर यांच्या आमदार फंडातून माढा 10 , करमाळा 16 , बार्शी तालुक्यातील 25 अशा एकूण 51 शाळांना प्रिंटर वाटप करण्यात आले .
यावेळी आमदार प्रा. जयंत आसगांवकर , आण्णासाहेब गायकवाड , बापू निळ , प्राचार्य डॉ. महेंद्र कदम , प्राचार्य राजेंद्र ठोंबरे , प्रा. जवानसिंग रजपूत , मुख्याध्यापक अमोल चव्हाण , सरपंच कांतीलाल नवले , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील ,. माजी संचालक संतोष पाटील , माजी सरपंच महादेव घाडगे , अनिल तोडकर आदी उपस्थित होते .
आमदार प्रा . जयंत आसगांवकर म्हणाले की , शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी येतात , परंतु आमदार म्हणून कायम तुमच्या पाठीशी राहणार आहे . शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत न्याय दिला जाईल . आमदार संजयमामा शिंदे व आमदार बबनराव शिंदे यांच्यामुळेच मला शिक्षण आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली .
प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र ठोंबरे यांनी केले . सुत्रसंचलन कोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश डोके यांनी केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा