ग्रीन ग्रीनफिंगर्स स्कूलमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
द ग्रीनफिंगर्स स्कूलमध्ये भारतीय अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर आर. व्ही. देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुरुवात परेड संचलनाने करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मा. प्राचार्य जॉर्ज पी. एस. यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये स्वातंत्र्यसंग्रामामध्ये सहभागी असणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पासून ते सध्याचे पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी यांचा 75 वर्षाच्या देशाच्या प्रगतीतील योगदानाचा प्रवास समूह नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आला. अध्यक्षांनी भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी उच्च दर्जाची इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा स्थापन केली त्यांच्या दूरदृष्टीचा आपणा सर्वांना आज प्रत्यय येत आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की भरपूर खेळा भरपूर अभ्यास करा कारण तुम्ही उद्याचे जबाबदार नागरिक आहात.
या कार्यक्रमास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष मा. आमदार श्री. रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा मा. सौ. सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील, स्कूलचे चेअरमन मा. श्री नितीन महादेवराव इंगवले- देशमुख, संस्थेचे विश्वस्त मा . श्री. विक्रमसिंह माने देशमुख प्राचार्य जॉर्ज पी. एस. व प्रशासकीय अधिकारी बी. एन. याबाजी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा