Breaking

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

*न्यू इंग्लिश स्कूल, डाळज येथे स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा.*



न्यू इंग्लिश स्कूल, डाळज येथे स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा.


   इंदापूर प्रतिनिधी - विजय कुताळ

*इंदापूर* तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल डाळज येथे स्वातंत्र्यदिनाचा  अमृत महोत्सव उत्साहात साजरा.

       सोमवार दिनांक 15 ऑगष्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राष्ट्रीय महापुरुषांची वेशभूषा परिधान करून आपले राष्ट्रप्रेम व्यक्त केले व त्यांची ट्रॅक्टरने संपूर्ण गावामधून मिरवणूक काढण्यात आली. यानंतर ग्रामपंचायत डाळज नं.2, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना व शेवटी न्यू इंग्लिश स्कूल डाळज येथे ध्वजारोहण करण्यात आले.


    न्यू इंग्लिश स्कूल, डाळज विद्यालयाचे ध्वजारोहण बारामती पोलीस स्टेशन निर्भया पथकाच्या प्रमुख सौ.अमृता भोईटे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी 75 क्रमांकाची मानवी आकृती कार्यक्रमस्थळी तयार करण्यात आली. नंतर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळा समितीचे निमंत्रित सदस्य श्री. डी एन काका जगताप यांनी भूषवले. यावेळी ग्रामपंचायत डाळज नं.2 यांचेमार्फत विद्यालयास शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या वस्तू भेट देण्यात आल्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सौ.अमृता भोईटे मॅडम यांनी मुलींना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून सांगत छेडछाड करणाऱ्या व्यक्ती विरोधात धाडसाने सामोरे जाण्याचे मार्गदर्शन केले.



  अध्यक्षीय भाषणात डी एन काका जगताप यांनी विद्यालयातील शिक्षकांचे कौतुक केले व विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षकांना सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच या कार्यक्रमास भिगवन पोलीस स्टेशनच्या हवालदार सौ.प्रिया पवार जगताप मॅडमही उपस्थित होत्या. सरपंच श्री.प्रदीप जगताप, उपसरपंच सौ.रोहिणी ताई काळे, विकास आढाव, अनिल भोसले, गीता ताई जगताप तसेच माजी विद्यार्थी व समस्त ग्रामस्थही उपस्थित होते.
  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शिंदे सर यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यालयातील सर्व अध्यापकांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अतिशय मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या खाऊचे  वाटप करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा