Breaking

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

न्यू इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी मध्ये श्री. परमेश्वर (मामा) देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण.


न्यू इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी मध्ये श्री. परमेश्वर (मामा) देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण.



प्रतिनिधी-टेंभुर्णी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष- मा. श्री ॲड.संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली व स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य- मा. श्री परमेश्वर सर्जेराव देशमुख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. प्रारंभी विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सर्व मान्यवर व देश प्रेमी नागरिक बंधू भगिनी यांचे क्रीडाशिक्षक श्री बोराडे सर, श्री मिरगणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बसवलेल्या लेझीम पथकाच्या साह्याने लेझीम प्रात्यक्षिक द्वारे व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. टेंभुर्णी व पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत रंगीबेरंगी रांगोळी व रंगीत कबुतरांच्या मनमोहक दृश्याने करण्यात आले. 




रांगोळीची सजावट विद्यालयाच्या शिक्षिका सौ.देशमुख मॅडम, सौ.घुले मॅडम, सौ.खंडागळे मॅडम व श्रीमती चव्हाण मॅडम यांनी केली.ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनोगतला वाव देण्यात आला कु.प्रतीक्षा डोके, वैष्णवी नाळे यांचे विचार तरुण पिढीला प्रेरणादायी ठरले तर तालबद्ध व्यायाम प्रकाराने विद्यार्थी मोहून गेले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यालयात एन एम एम एस परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा विद्यालयाच्या व पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री लेंडवे एस.डी, पर्यवेक्षक मा. श्री भुजबळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान महत्वाचे ठरले.ध्वनिक्षेपण  व्यवस्था श्री. राऊत जी.एस व श्री अवघडे जे.एन यांनी पाहिली तर विद्यार्थी शिस्तीचे नियोजन व व्यवस्थापन श्री गायकवाड के. एस, श्री मोरे पी.बी, श्री.सुतार ए. बी व ज्येष्ठ शिक्षक शिंदे सर यांनी केले.श्री सावंत आर.डी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. फलक लेखन व भारताच्या नकाशाचे रेखाटन कलाशिक्षक श्री. खंडागळे आर.आर यांनी केले. श्री मिटकर सर यांनी इलेक्ट्रॉनिक विभाग सांभाळला. या ध्वजारोहण सोहळ्यास प्रा. श्री कुटे, प्रा. श्री क्षीरसागर,प्रा. श्री घाडगे, रमेश- नाना येवले पाटील, वसंत- तात्या येवले पाटील, नानासाहेब कटके, मा.श्री दादासाहेब  गायकवाड,मदन कुमार शहा, मधुकर देशमुख,ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ सटाले, राहुल तिपाले,नागनाथ वाघे, भास्कर सोनवणे यांचे सह टेंभुर्णी व टेंभुर्णी पंचक्रोशीतील अनेक देश प्रेमी नागरिक बंधू -भगिनी व विद्यालयाचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांना जिलेबी,चॉकलेट, बिस्किटे व गोळ्या यांचे वाटप करण्यात आले. सर्व उपस्थित त्यांचे आभार श्री लष्कर सर यांनी मांडले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक श्री बरबडे सर यांनी केले. अमृत महोत्सवी उत्कृष्ट नियोजनाने ध्वजारोहण साजरे केल्यामुळे सर्व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा