Breaking

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

विठ्ठलराव शिंदे कारखान्यास को-जन असोसिएशन ऑफ इंडिया कडून सहकार क्षेत्रातील सर्वोत्कृष्ठ कोजनरेशन प्लॅन्ट चा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर-

विठ्ठलराव शिंदे  कारखान्यास को-जन असोसिएशन ऑफ इंडिया कडून सहकार क्षेत्रातील सर्वोत्कृष्ठ कोजनरेशन प्लॅन्ट चा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर-


Aj24taas News साठी पिंपळनेर प्रतिनिधी/महेश देशमुख
*****************************************
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास को-जन असोसिएशन ऑफ इंडिया कडून सहकार क्षेत्रातील सर्वोत्कृष्ठ कोजनरेशन प्लॅन्ट चा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, को-जन असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची सर्वोत्कृष्ठ को जनरेशन प्लॅन्टची तृतीय क्रमांकासाठी नॅशनल को-जनरेशन ॲवार्डस अंतर्गत निवड समितीने निश्चित केलेली आहे. ही निवड सहकार क्षेत्रातील प्रकल्पाअंतर्गत बॉयलर 67 kg/cm2 पेक्षा जास्त क्षमता  वर्गीकरणात करण्यात आली आहे. या पुरस्काराचे  वितरण शनिवार दि.27 ऑगस्ट,2022 रोजी मुंबई येथे होणार आहे. सदर पुरस्कार केंद्रीय रस्ते परिवाहन तथा राजमार्ग ना.नितीन गडकरी, खा.शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते प्रदान  करण्यात  येणार  आहे.

यापूर्वी कारखान्यास चाचणी गळीत हंगामामध्ये विक्रमी ऊस गाळप, उत्तम आर्थिक व्यवस्थापन, उच्चांकी साखर निर्यात, उच्चांकी ऊस गळीताबद्दल देशपातळीवरील पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच कारखान्यास आत्तापर्यंत देश व राज्य पातळीवरील 21 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

कारखान्यास जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभासद, ऊस पुरवठादार,ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदार, मजूर, व्यापारी, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, एस.आर.यादव  खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

चौकट- विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे इन्स्टुमेंट इंजिनिअर श्री.अजित प्रभाकर माने यांना कारखान्याचे को-जन प्रकल्पाकडील भरीव कामगिरीसाठी को-जन असोसिएशन ऑफ इंडिया यांचेकडून इन्स्टुमेंट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ठ इन्स्टुमेंटेशन व्यवस्थापक पुरस्कार जाहीर झालेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा