बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्य विद्यालयाचे एन.एम.एम.एस परीक्षेत घवघवीत यश
कन्हेरगाव(प्रतिनिधी) राजेंद्र केदार
अकोले (खु.) ता.माढा येथील मा.बबनरावजी शिंदे विद्यालयातील विद्यार्थी सन - २०२२ च्या एन . एम . एम . एस . परीक्षेस ३० विद्यार्थी बसले होते .राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षा इयत्ता आठवीचा निकाल जाहीर झाला असून या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे बादल गौरव लक्ष्मण -१२५ गुण, लोकरे अस्मिता महादेव - ११७ गुण,पाटील तेजश्री तात्यासाहेब - ११० गुण ,हजारे उत्पाल उत्तरेश्र्वर - १०६ गुण ,नवले राजकुमारी गणेश - १०३ गुण ,देवडकर अथर्व महेश - १०२ गुण ,भगत स्वागत बापू - १०० गुण
या विद्यार्थ्यांना १८० पैकी १०० पेक्षा जास्त गुण मिळाले असून ३० पैकी तब्बल २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक विजयकुमार साखरे , संभाजी अनपट , नागणे , प्रकाश खेताडे , सचिन गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे आ.बबनदादा शिंदे,संस्थेचे अध्यक्ष आमदार संजयमामा शिंदे, सोलापूर जिल्हा दूध संस्थेचे चेअरमन रणजीतसिंह शिंदे,सभापती विक्रमदादा शिंदे,माढा वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन धनराज दादा शिंदे,निमगाव (टें) चे सरपंच यशवंतभैय्या शिंदे, संस्थेचे सचिव तथा प्राचार्य राजेंद्र ठोंबरे सर, विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला, अंबाडचे प्राचार्य रजपूत सर, कै .विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला, कन्हेरगाव चे मुख्याध्यापक अमोल लोंढे व मुख्याध्यापिका मधुरा सुरवसे मॅडम यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या... .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा