Breaking

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

महाड मध्ये कॅांग्रेसची आझादी गौरव पदयात्रा चित्तदरवाजा ते चवदारतळे पदयात्रेत शेकडो कॅाग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग*



महाड मध्ये कॅांग्रेसची आझादी गौरव पदयात्रा चित्तदरवाजा ते चवदारतळे पदयात्रेत शेकडो कॅाग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग 



 महाड : . प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस तर्फे संपुर्ण राज्यभरात आयोजीत केलेली “आझादी गौरव पदयात्रा “ आज रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चित्त दरवाज्या पासून सुरवात करून महाड च्या चवदार तळे येथे याचा समारोप करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस तर्फे संपुर्ण राज्यभरात आयोजीत केलेली “आझादी गौरव पदयात्रा “ आज महाड मध्ये काढण्यात आली ही यात्रा सकाळी ८ रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी चित्त दरवाजा पासून सुरू करण्यात अली. या पदयात्रेचा समारोप सायंकाळी ४ वाजता चवदार तळे येथे करण्यात आला . मुसळधार पावसातही या पदयात्रेत महाड तालुक्यातील शेकडो कॅांग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते . या पदयात्रेत मध्ये रायगड जिल्हा कॅांग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत , रायगड जिल्हा महिला कॅांग्रेसच्या अध्यक्षा ॲड विद्या ठाकूर , प्रदेश महिला कॅांग्रेसच्या सरचिटणिस स्नेहल जगताप , जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंत जगताप , तालुका कॅाग्रेस अध्यक्ष राजेंद्र कोरपे , धनंजय देशमुख , माजी नगराध्यक्ष संदीप जाधव ,कृष्णा शिंदे , अजय सलागरे , शहराध्यक्ष सुदेश कलमकर , शहर महिला अध्यक्षा अस्मिता शिंदे , माजी नगरसेविका मयुरी शेडगे , रश्मी बाईत , निता शेठ , मेघा पवार , पांडूरंग निवाते , यांच्यासह महाड शहर व तालुक्यांतील कॅांग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सहभागी झाले होते . या पदयात्रेत भारत माता की जय , वंदे मातरम आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता .तर मोदी सरकारच्या धोरणांविरोधांचा धिक्कार करीत मोदी सरकार विरोधात घोषणाही देण्यात आल्या . चवदार तळे येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला , त्यावेळी सर्व नेत्यांनी भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा