Breaking

सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सचिन जगताप यांची निवड*



*संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सचिन जगताप यांची निवड*




!!!!!!!!!!!!!!!!!! AJ24Taas News !!!!!!!!!!!!!!!!!!!



संभाजी ब्रिगेड महासचिव सौरभ खेडेकर यांनी दोन दिवसीय सोलापूर जिल्हा दौरा केला यावेळी  शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे झालेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेड सोलापूर-पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्षपदी पुनश्च सचिन जगताप यांची निवड जाहीर करण्यात आली.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्कप्रमुख अभिमन्यू पवार,राज्य संघटक मनोजकुमार गायकवाड,पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे,रा.का.सदस्य दिनेश जगदाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना नुतन जिल्हाध्यक्ष सचिन जगताप म्हणाले युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे विचार तसेच संभाजी ब्रिगेड अध्यक्ष अॅड.मनोज दादा आखरे महासचिव सौरभ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे काम सुरू असुन पुनश्च संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. गेल्या टर्म मध्ये सातत्याने मराठा आरक्षण,ऐतिहासिक आंदोलने,मराठा क्रांती मोर्चा,रास्ता रोको,धरणे आंदोलन,जेल भरो,शिव-शाहू रथ यात्रा,मराठा-मुस्लिम-धनगर आरक्षणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यांना विठ्ठलपुजेपासुन रोखलेले आंदोलन असो कि शेतकरी प्रश्नावर सातत्याने उजनी धरणावरील 5 टीएमसी आंदोलन,कुर्डू पाणीप्रश्नाबाबत चक्री उपोषण,शेतकरी कर्जमाफी, बोगस बियाणे, कृत्रिम खतटंचाई, उसदर आंदोलन अशा विविध सातत्याने प्रश्नावर काम करता आले.यासोबत CAA विरोधात मोर्चा सातत्याने विविध महापुरुषांच्या जयंती-स्मृतिदिन साजरे करुन सामाजिक सलोखा राखण्यात मोठा वाटा आहे.यासोबतच ग्रां.पं, जि.प.पं.स,कृषी उत्पन्न बाजार समिती, लोकसभा, विधानसभा,सिनेट,पुणे पदवीधर,बार कौन्सिल ई. निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेडने आपले नशीब आजमावले भविष्यातही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ताकदीने निवडणुकीत उतरु असेही जगताप म्हणाले.यापुढील काळात संभाजी ब्रिगेड माध्यमातून गाव तिथे संभाजी ब्रिगेड- घर तिथे कार्यकर्ता हे अभियान राबविण्यात येणार असून उपेक्षित घटकांसाठी- शेतकरी-शेतमजुर यांच्यासाठी काम करत राहू असे जगताप यांनी सांगीतले.

*बैठकीस प्रसंगी शिवश्री सौरभ दादा खेडेकर महासचिव संभाजी ब्रिगेड, शिवश्री अभिमन्यू पवार- प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख,इंजि मनोजकुमार गायकवाड- महाराष्ट्र राज्य संघटक , शिवश्री दिनेश जगदाळे-रा. कार्य.सदस्य,शिवश्री सुहास टोणपे - जि.सचिव,शिवश्री विजयकुमार परबत - जि.संघटक ,शिवश्री बालाजी जगताप - मा.तालुकाध्यक्ष,शिवश्री नितीन खुळे - शहराध्यक्ष टेंभुर्णी,शिवश्री धनराज पवार - शहराध्यक्ष कुर्डूवाडी,शिवश्री अविनाश पाटील - ता.उपाध्यक्ष, शिवश्री अमोल पाटील - ता. उपाध्यक्ष,शिवश्री प्रकाश नागटिळक - ता.उपाध्यक्ष, शिवश्री रणजीत देशमुख - ता.उपाध्यक्ष,शिवश्री गणेश शिंदे - ता.संपर्कप्रमुख करमाळा,शिवश्री आबासाहेब गोरे - ता.सचिव,शिवश्री बाळासाहेब वागज - ता.संघटक,शिवश्री नितीन मुळे - ता.संघटक,शिवश्री अजय गायकवाड - तालुकाध्यक्ष का.आ.शिवश्री शंकर नागणे - तालुकाध्यक्ष वि.आ.शिवश्री किरण जाधव - ता.उपाध्यक्ष वि. आ. शिवश्री श्रीकांत गायकवाड - कूर्डू विभागप्रमुख,शिवश्री अभयसिंह पाटील-गटप्रमुख पिंपळनेर,शिवश्री रोहित पाटील -गट प्रमुख,शिवश्री बाळासाहेब भोसले - शाखाप्रमुख कुर्डू, शिवश्री नानासाहेब कौलगे - शाखाप्रमुख परिते,शिवश्री शाहीर विशाल इंदलकर,शिवश्री अविनाश इंदलकर,शिवश्री योगेश मुळे,शिवश्री अविनाश जगताप,शिवश्री जयसिंग जगताप,शिवश्री महेश देशमुख,शिवश्री पिंटू देशमुख, शिवश्री बालाजी देशमुख, शिवश्री सौरभ जगताप,शिवश्री निखील मुळे,शिवश्री राजाभाऊ व्यवहारे ई*..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा