Breaking

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग घेतला


*स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग घेतला


कुर्डुवाडी/प्रतिनिधी
 महावितरण बारामतीचे   मुख्य अभियंता  पावडे  , अधीक्षक अभियंता सोलापूर  चे सांगळे , कार्यकारी अभियंता बार्शी चे कु-हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण, उपविभागीय कार्यालय, कुर्डुवाडी येथे, कुर्डुवाडी, टेंभुर्णी व माढा या तिन्ही उपविभागाच्या संयुक्त विद्यमाने  दि. ८ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये तिन्ही उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत एकूण ७६ जणांनी रक्तदान केले, सदरचा कार्यक्रम उपकार्यकारी अभियंता  संतोष चव्हाण, यु.जी.जाधव ,कॅरमकोंडा याच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला, सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  अभियंता विभागाचे ए.एस.आवटे,  पी.जे.पाटणकर, एम.डी. राजमाने, सौ.बी.एम.वाघमारे , मानव संसाधन विभागाचे ओंकार वाळके,  बिलिंग विभागाचे  विशाल शेवाळे, अस्लम शेख, संघटना प्रतिनिधी  आर बी पवार , .एम.बी.अनंतकवळस व  एस.आय. पठाण यांनी सहकार्य केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा