*कंदर-केम-रोपळे रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करुन केम येथे रेल्वेमार्गावर उड्डाण पुल उभारणीसाठी ७५ कोटींचा निधी द्याः
केंद्रीय मंत्री ना.गडकरी यांचेकडे आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांची मागणी
करमाळा प्रतिनिधि अलीम शेख मो ९८५०६८६३६०
रोपळे-केम-कंदर-कन्हेरगाव MRD 12 हा महत्वाचा जिल्हा मार्ग असुन या रस्त्याची सद्या बिकट अवस्था झालेली आहे.या रस्त्यावर सद्या सिंगल वाहन बसणे ही कठीण झाले आहे.या रस्त्याच्या परिसरातील कृषी उत्पादने केवळ सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर अनेक बाजारपेठेत जात असतात.तसेच या रस्त्याच्या माध्यमातुन अनेक साखर कारखान्यांना उसाचा पुरवठा होत असतो.याच मार्गावर केम हे देशातील कुंकु उत्पादनाचे प्रसिद्ध औद्योगिक केंद्र आहे.केममध्ये सुमारे ४२ कुंकांचे कारखाने असुन देशातील व महाराष्ट्रातील सर्व मोठ्या मंदिरांना येथुन कुंकवाचा पुरवठा होत असतो.त्यामुळे या भागाला जोडणारे रस्ते चांगल्या स्थितीत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
सद्यस्थितीत या भागांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी वाहतुकीची चांगली सोय नाही.रोपळे-केम-कंदर-कन्हेरगावया रस्त्याची एकुण लांबी ३१ कि.मी असुन त्याच्या विकासासाठी रेल्वेच्या सेंट्रल मार्गावर केम येथे उड्डाण पुल उभारण्याची अत्यंत गरज आहे.सदर मार्गाचे व उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्यात आले असुन. रोपळे -केम -कंदर- कन्हेरगाव या रस्त्याचे २१फुटापर्यंत रुंदीकरण करणे अपेक्षित आहे त्यासाठी ४० कोटी रुपये व उड्डाणपुलासाठी ३५ कोटी रुपये एवढ्या निधीची गरज आहे.
या भागाचे नेते अजित तळेकर यांनी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे या रस्त्याच्या रुंदीकरण,मजबुतीकरण व उड्डाणपुल यासाठी निधी उपलब्द व्हावा अशी मागणी केली होती.त्यानुसार आ.मोहिते पाटील यांनी मुंबई येथे केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांची भेट घेवुन सदर मार्गासाठी ७५ कोटी रुपये ची केंद्रीय मार्ग निधीतुन तरतुद करण्यात यावी अशी मागणी केली.
यावेळी अकलुजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील व कंदर येथील आ.मोहिते पाटील यांचे सहकारी ज्ञानेश पवार उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा