Breaking

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

आदर्श फाउंडेशन च्या वतीने किरणताई नवगिरे यांचा सन्मान!



आदर्श फाउंडेशन च्या वतीने किरणताई नवगिरे यांचा सन्मान! 


    भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी मिरे ता. माळशिरस जिल्हा सोलापूर या छोट्या गावची कन्या किरण नवगिरे यांची निवड झाल्याबद्दल आदर्श फाउंडेशन च्या वतीने त्यांचा  यथोचित सन्मान करण्यात आला .याप्रसंगी आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष मोटे यांनी प्रास्ताविक केले .या प्रास्ताविका त्यांनी किरणच्या या दैदिप्यमान यशाचे कौतुक केले .तर उपाध्यक्ष महादेव पवार यांनी" किरणताई म्हणजे एका सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी जिद्द ,चिकाटी, परिश्रम आणि संयमाच्या जोरावर हे उज्वल यश मिळविलेले आहे .या यशाच्या पाठीमागे त्यांचे आई-वडिलांचे फार मोठे योगदान आहे. अतिशय लहान गावातील आणि गरीब कुटुंबातील मुलगी यशो शिखरावर जाऊ शकते हे ग्रामीण भागातील मुलींनी आणि विशेषता पालकांनी किरण कडे बघून लक्षात घ्यावे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या मुलांचं करियर निवडावे असे गौरवोद्गार या सन्मान प्रसंगी त्यांनी काढले." तर सन्मानाला उत्तर देताना किरण ताई म्हणाल्या ,भारतीय महिला संघाला विश्व विजेतेपद मिळवून देणे हे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मी खूप सराव करीत आहे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे मी 100% हे यश मिळवून देऊ शकते याचा मला पूर्ण विश्वास आहे.मला विशेषतःषटकार मारायला खूप आवडते ,असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाचे आभार विजय जगताप यांनी मानले.या कार्यक्रम प्रसंगी प्रभू नवगिरे व त्यांचे सर्व कुटुंबीय तसेच सागर दादा घोडके, विजय वेळापुरे हेही याप्रसंगी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा