पिलीव येथे जि. प.प्रा.शाळा पिलीव येथे पंचायत समिती माळशिरस यांचे तर्फे सायकल बँकेतून100 सायकलींचे वाटप
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस
जिल्हा परिषद केंद्र शाळा पिलीव येथे पंचायत समिती माळशिरस तर्फे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 100 गरजू मुलीना सायकल बँक योजनेतून पिलीव येथे समारंभ पूर्वक वाटप करण्यात आले या सायकल बँक वाटपाच उद्घाटन समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या आनंदमय सोहळ्याचे उद्घाटन सायकल बँक व शैक्षणिक दशसूत्री उपक्रमाचे प्रणेते सोलापूर जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते पार पडले .
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी किरण लोहार, माळशिरस तालुक्याचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे , जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, पिलीव नगरीचे सरपंच नितीन मोहिते, माळी उपसरपंच सौ. सोनाली करमाळकर, माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख , शालेय पोषण आहार अधीक्षक, सोलापूर, शिक्षण विस्ताराधिकारी हरिश राऊत शिक्षण विस्ताराधिकारी प्रदीप करडे ,शिक्षण विस्ताराधिकारी स्वामी मॅडम , शिक्षण विस्ताराधिकारी गोदावरी राठोड मॅडम , विस्ताराधिकारी हर्षवर्धन नाचणे शिक्षण विस्ताराधिकारी मुलाणी मॅडम या मान्यवरांच्या हस्ते पार पडले . श्री पारसे सर व विद्यार्थी यांनी गायलेल्या स्वागत गीताने वातावरणामध्ये नवचैतन्य निर्माण झाले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी केले .निमगाव( म ) जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झालेले हा सायकल बँकेचा उपक्रम हळूहळू कसा विस्तारत झाला आहे याचा आढावा देशमुख यांनी सर्वांसमोर मांडला व पुढील 14 जानेवारी पर्यंत माध्यमिक शाळा 3700 सायकल वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला . सायकल बँकेमुळे वाडी वस्तीवरील मुलींच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची सर्वांना हमी दिली आणि पुढील एक महिन्यात 1000 सायकलीचा टप्पा पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली .जिल्हा परिषद पिलीव येथील पाचवीच्या वर्गाच्या प्रगतीचा आढावाही त्यानी घेतला 2019 यावर्षी चार व 2020-21 यावर्षी तब्बल दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकली हे अभिमानाने सांगताना माझा शिक्षक गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही कमी पडत नाही हे व्यक्त केले .
गट विकास अधिकारी विनायक गुळवे यांनी सांगितले की या अमृत महोत्सवी वर्षाच्या उपक्रमात माळशिरस तालुक्यामध्ये 70 हजार ध्वज फडकवण्यात आले व याचे सर्व श्रेय शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व सर्व शिक्षक वर्गाला दिले.
सोलापूर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी सोलापूर जिल्ह्याची शिक्षणाची धुरा सांभाळताना सुरुवातीलाच पाचवी व आठवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती चा उपक्रमराबवल्याचे सांगितले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा हा विषय जिव्हाळ्याचा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून सुरुवात करावी असे सांगितले .
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सायकल बँकेची मूळ संकल्पना ही मुलींचे शिक्षण हे आहे असे सांगितले ग्रामीण भागात आजही मुलीला दुय्यम स्थान दिले जात असल्याचे सांगितले . या उपक्रमामुळे आज अखेर दोन हजार मुली त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहे व या उपक्रमामुळेच त्यांना आपण शिक्षण प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडले आहे
स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमामुळे शाळा सुंदर झाल्या ही बाब गौणआहे तर मुख्य बाब म्हणजे पालकांच्या मनात ही माझी शाळा आहे ही भावना रुजली ही बाब खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले .
माझे मुल माझी जबाबदारी या उपक्रमामुळे 35 मुलांचे जीव वाचवण्यात आपल्याला यश आलेले आहे हे व्यक्त केले .याचबरोबर सध्या हाती घेतलेल्या जीवनाची हमी- बालमृत्यूची कमी या उपक्रमाविषयी माहिती दिली . गुणवत्तेच्या शिक्षणाबरोबरच आपण मूल्य संस्कारक्षम शिक्षण दिले पाहिजे आणि यासाठी दशसूत्री उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले .
सायकल बँक उद्घाटनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा पिलीव येथील शैक्षणिक वातावरण , शाळेचे बाह्यरूप उत्कृष्ट व प्रसन्न आहे , तसेच गावचे उत्कृष्ट असे सहकार्य असल्याचे सांगितले .
सायकलबँकेच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी श्री हर्षवर्धन नाचणे साहेब यांनी केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी प्रदीप करडे यांचे नियोजन आणि केंद्र प्रमुख राजकुमार फासे यांच्यासह पिलीव केंद्रातील सर्व शिक्षकांनी व विषय तज्ञ करचे, घुले, चंदनशिवे यांनीपरिश्रम घेतले. यामुळे कार्यक्रम खूप छान झाल्याचे शिक्षण, पालक व विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अँड.वैभव मेथवडे,यांनी मनोगत व्यक्त केले सुत्रसंचलन शिक्षक सुहास उरवणे यांनी तर आभारप्रदर्शन विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे यांनी व्यक्त केले
फोटो. पिलीव येथे सायकल बँक वाटपाचे उद्घाटन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी,किरण लोहार, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, गणेश पाटील, नितीन मोहिते माळी उपसरपंच सौ.सोनाली करमाळकर प्रभारी केंद्रप्रमुख राजकुमार फासे आदि. मान्यवर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा