*गणपती फार्मसी मध्ये जागतिक औषधनिर्माता दिनानिमित्त कोविड योद्धांचा सन्मान*
टेंभुर्णी प्रतिनिधी अमोल भोसले
मौजे अकोले (खु), तालुका माढा येथील श्री गणपती औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात जागतिक औषधनिर्माता दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी कोविड साथीमध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता अविरतपणे रुग्णांची सेवा केलेल्या औषधनिर्मात्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. महाविद्यालय व माढा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे माजी अध्यक्ष सचिन साखरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच माढा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष राहुल काळे, तालुका संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी गणपती फार्मसी चे सचिव डॉ. आर.डी. बेंदगुडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना औषधनिर्माता दिनाच्या शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमाच्या निमित्ताने भविष्यात महाविद्यालय व केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्यातील ऋणानुबंध अधिक घट्ट होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॕड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. सुकुमार लांडे व प्रा. रूपाली राऊत यांनी काम केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा