Breaking

सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

28 लाख टन गाळपाचे उद्दिष्ठ- आ.बबनराव शिंदेविठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 व 2 च्या हंगाम 2022-23 चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न-पिंपळनेर प्रतिनिधी महेश देशमुख



28 लाख टन गाळपाचे उद्दिष्ठ- आ.बबनराव शिंदे


विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 व 2 च्या हंगाम 2022-23 चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न-



 

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याच्या गाळप हंगाम 2022-23 चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोमवार दि.26/09/2022 रोजी विठ्ठल कॉर्पोरेशनचे संस्थापक चेअरमन आ.संजयमामा शिंदे यांचे  शुभहस्ते व संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

सोमवार दि.26/09/2022 रोजी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. च्या युनिट नं.1 पिंपळनेरचा सकाळी 10 वा. व युनिट नं.2 करकंब चा दुपारी 12.25 वा .चे शुभमुहुर्तावर गाळप हंगाम 2022-23 चा अनुक्रमे 22 वा व 4 था बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विठ्ठल कॉर्पोरेशनचे संस्थापक चेअरमन आ.संजयमामा शिंदे यांचे  शुभहस्ते व संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरूवात  कै.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथे ऊस गाळप हंगाम 2022-23 मध्ये 22 लाख मे.टन गाळप करणेचे उद्दिष्ठ ठेवलेले आहे. या गाळप हंगामासाठी युनिट नं. 1 कडे 35 हजार 441 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद असून अंदाजे 31 लाख मे.टन ऊस गळीतास उपलब्ध होईल. कारखान्याने प्रतिदिन गाळप क्षमतेएवढा उसाचा पुरवठा होण्यासाठी 874 ट्रक्स/ट्रॅक्टर्स, 1500 बैलगाडी व 965 ट्रॅक्टर टायरगाडीचे करार करण्यात आलेले आहेत. केंद्रशाससाने इथेनॉल उत्पादनास दिलेल्या प्रोत्साहनातंर्गत कारखान्याने सध्याचे डिस्टीलरी प्रकल्पाची क्षमता 150 केएलपीडीवरून 250 केएलपीडी पर्यंत विस्तारवाढ केलेली आहे. सदर नवीन 100 केएलपीडी डिस्टीलरी प्रकल्प नोव्हेंबर पासून कार्यान्वीत होणार असून या प्रकल्पातून उत्पादीत होणारे  इथेनॉल ऑईल कंपन्यांना विक्री करण्यात येणार आहे.  चालू गळीत हंगामामध्ये ज्युस टू  इथेनॉल उत्पादनासाठी भर देणार असल्याचे आ.बबनराव शिंदे  यांनी याप्रसंगी सांगितले.


तसेच विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.2 करकंब येथे 6 लाख मे.टन गाळप करणेचे उद्दिष्ठ ठेवलेले आहे. या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे 7 हजार 904 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद असून अंदाजे 7 लाख मे.टन ऊस गळीतास उपलब्ध होईल. कारखान्याने प्रतिदिन गाळप क्षमतेएवढा उसाचा पुरवठा होण्यासाठी 257 ट्रक्स/ट्रॅक्टर्स, 50 बैलगाडी व 127 ट्रॅक्टर टायरगाडीचे करार करण्यात आलेले आहेत. युनिट नं.1 व 2 ची ऑफ सिझन मधील सर्व कामे पूर्ण झालेली  असून दोन्ही युनिटचे मिळून 28 लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ठ असून गाळप हंगाम शासनाचे धोरणानुसार 15 ऑक्टोबर पासून सुरू करणेस यंत्रणा सज्ज झाली आहे.

 

 

 

 
विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 व 2 येथे मागील गाळप हंगाम 2021-22 मध्ये  गाळप ऊसास संपूर्ण एफ.आर.पी. प्र.मे.टन रू.2604/- प्रमाणे ऊस पुरवठादारांना  अदा केलेली आहे. तसेच या  हंगामातील संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक बिले व कमिशन डिपॉझीट वाहनमालकांना अदा  करणेत आलेले  आहे अशी माहीती आ.बबनराव शिंदे  यांनी याप्रसंगी दिली.

 

चौकट-

बॉयलर पुजन प्रसंगी युनिट नं.1 कडे सन 2021-22 गळीत हंगामामध्ये एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणारे ऊस उत्पादक सोमनाथ भास्कर हुलगे व त्यांच्या सुविद्य पत्नी दिपाली सोमनाथ हुलगे रा.बेंबळे व युनिट नं.2 कडे प्रकाश बापुराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी पद्मजादेवी प्रकाश पाटील रा.तुंगत यांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापुजा पार पडली.



सदर प्रसंगी व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे,संचालक विक्रमसिंह शिंदे,वेताळ जाधव, सुरेश बागल,प्रभाकर कुटे, लक्ष्मण खुपसे, शिवाजी डोके, पोपट गायकवाड, निळकंठ पाटील, संदीप पाटील, लाला मोरे, पांडूरंग घाडगे, सुभाष नागटिळक, सचिन देशमुख, कार्यकारी संचालक एस.एन. डिग्रजे, युनिट नं.2 चे जनरल मॅनेजर एस.आर.यादव,  वर्क्स मॅनेजर ए.डी.ढेकाने,जनरल मॅनेजर प्रोसेस पी.एस.येलपले, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही. बागल, केन मॅनेजर एस.पी.थिटे,फायनान्स मॅनेजर डी.डी.लव्हटे, मुख्य शेतकी अधिकारी एस.एस. बंडगर,   चिफ इंजिनिअर एस.एस.महामुनी, चिफ केमिस्ट बी.जे.साळुंके, शेतकी अधिकारी बी.डी.इंगवले, परचेस ऑफिसर जे.डी. देवडकर, सिव्हील इंजिनिअर एस.आर.शिंदे व इतर मान्यवर उपस्थित  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा