*टेंभुर्णी येथिल भवानी माता मंदिरात सरपंच प्रमोद कुटे यांच्या हस्ते घटस्थापना *
टेंभुर्णी दि.२६ (प्रतिनिधी) टेंभुर्णी येथिल पुरातण भवानी माता मंदिरात सोमवारी विधिवत पुजा करुन मोठ्या उत्साहात टेंभुर्णी चे सरपंच प्रमोद कुटे टेंभुर्णी शहर शिवसेनाप्रमुख सुरेश लोंढे परमेश्वर खरात सिकंदर आतार यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली
यावेळी जय भवानी माता मंदिर ट्रस्ट चे आध्यक्ष सोपान ढगे उपाध्यक्ष वसंत ढगे उपसरपंच धनंजय गोंदील अमोल डोईफोडे टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ साळुंखे गणेश केचे शैलेश ओव्हाळ विठ्ठल कोळपे ग्रामविकास अधिकारी मधुकर माने आधी मान्यवर उपस्थित होते
माढा तालुक्यातिल टेंभुर्णी येथील भवानी नगर परीसरातील जय भवानी मात मंदिरात सोमवार दिनांक 26 रोजी दुपारी विधिवत पुजाआर्चा करुन आई राजा उदो उदो च्या जयघोषात मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली .क वर्ग तिर्थक्षेत्र असलेल्या या मंदिराला सालाबादाप्रमाणे रंगरंगोटी सुनिल आळंदे यांनी मोफत केली असुन मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे .नवरात्र कालावधीत पहाटे महापुजा व काकडआरती केली जाते तर सायंकाळी महाआरती केली जाते.या आरतीचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होते.यावेळी टेंभुर्णी पोलीसांकडुन चोख बंदोबस्त ठेवला जातो .पहाटे आरतीच्यावेळी येणाऱ्या भाविकांना प्रती वर्षी टेंभुर्णी शहर शिवसेनेच्यावतिने मोफत चहा वाटप केला जातो तर विविध सामाजीक संघटनांकडुन फराळाचे वाटप केले जाते.नवरात्र पार पाडण्या साठी ट्रस्ट चे अध्यक्ष सोपान ढगे उपाध्यक्ष वसंत ढगे खजीनदार दत्तात्रय देवकर सचिव परमेश्वर खरात सदस्य अनंता कुटे तुकाराम ढगे विलास सावंत यचेसह पुजारी मधुकर मोकाशी राजू बागडे खंडू गोरे संदिप मोकाशी परिश्रम घेतात.
टेंभुर्णी शहर व परिसरातील विविध संघटनाने आणलेल्या भवानी ज्योतीचे आगमन भवानी माता मंदिरात दिवसभर चालू होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा