Breaking

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर येथे 'चरित्रकथनातून' आद्यक्र‍ांतिवीर उमाजीराजे नाईक यांची २३१ वी जयंती सोहळा संपन्न*



*लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर येथे 'चरित्रकथनातून' आद्यक्र‍ांतिवीर उमाजीराजे नाईक यांची २३१ वी जयंती सोहळा संपन्न* 


    श्री माऊली शिक्षण प्रसारक  समाज सेवा मंडळ संचलित लक्ष्मी आनंद विद्यामंदिर & ज्युनि. कॉलेज, टेंभुर्णी येथे ७ सप्टेंबर रोजी 'आद्य क्रांतिवीर उमाजीराव नाईक' यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी प्रशालेचे प्राचार्य श्रीकांत राऊत सर, समन्वयक करळे सर य‍ांच्या हस्ते उमाजीराजेंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 
          

        त्यानंतर उमाजीराजे नाईक यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्यात आला. यामध्ये त्यांचा जन्म, इंग्रजी राजवटीविरोधात आंदोलन, समाजजागृतीचे कार्य, बंड, कारवाया, जेजुरीगडावरील राज्याभिषेक, स्वतंत्र सैन्यबळ, स्रिय‍ांच्या सन्मानार्थ प्रबोधन व कार्य, इंग्रजांविरोधात काढलेला जाहीरनामा, तब्बल १४ वर्षे दिलेला सशस्र लढा, दुसरे शिवाजी होतील अशी इंग्रजांची भीती आणि अखेर अटकेनंतरची फाशी इ. सत्य घटन‍ांवर आधारीत 'चरित्रकथन' करण्यात आले.  विद्यार्थ्यांना सखोल माहिती देत हा जयंती सोहळा संपन्न झाला. 
              यावेळी संस्थेचे अध्यक्ष योगेशजी(बाबाराजे) बोबडे, सचिवा सौ.सूरजा बोबडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्साहात  पार पडला. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा