Breaking

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

आम आदमी पार्टीची रांझणी मध्ये शाखा स्थापन, शाखाध्यक्षपदी सोमनाथ बागल यांची निवड.



आम आदमी पार्टीची रांझणी  मध्ये शाखा स्थापन, शाखाध्यक्षपदी सोमनाथ बागल यांची निवड.



भिमानगर प्रतिनिधी/
आम आदमी पार्टी, माढा तालुका टीम कडून संपूर्ण तालुक्यात गाव तिथं शाखा हा उपक्रम राबविला जात आहे.याच अनुषंगाने रांझणी मध्ये शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी शाखा अध्यक्ष पदी सोमनाथ बागल यांची निवड करण्यात आली आहे. गोविंद माने उपाध्यक्ष, विकास यादव उपाध्यक्ष, सुरज शिंदे सचिव ,ओंकार यादव सहसचिव, विकास औताडे सरचिटणीस, रोहित गायकवाड सोशल मीडिया प्रमुख, आचल शिंदे यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी तरुण पिढी नक्कीच समोर येऊन आप सोबत काम करेन असा संकल्प या वेळी केला ...आगामी काळात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम आदमी पार्टीचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अरविंद केजरीवाल यांचे विकासाचे राजकारण पुढे घेऊन जाण्यासाठी तरुण पिढी पुढं सरकत आहे . माढा तालुक्याला भ्रष्टाचारमुक्त पर्याय देऊन तालुक्याचा अधिकाधिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम आदमी पार्टीची माढा तालुक्याला गरज असल्याची भावना सर्व युवक वर्गामध्ये आहे. त्यामुळे सर्व युवक एकत्रित येऊन तालुक्यामध्ये मध्ये नक्कीच बदल घडवून आणतील असा विश्वास आम आदमी पार्टीचे माढा तालुका अध्यक्ष गगन गोडसे सर यांनी व्यक्त केला. आम आदमी पार्टीमध्ये लोकांना काम करण्यासाठी भरपूर संधी असल्याने युवक वर्ग आप कडे आकर्षित होत आहे.  आम आदमी पार्टीचा प्रचार,प्रसार करण्यासाठी  कटिबद्ध असल्याचे सर्व नवनियुक्त पदाधिकऱ्यांनी सांगितले. या कार्यक्रमावेळी आम आदमी पार्टीचे माढा तालुका अध्यक्ष गगन गोडसे सर, सचिव अनंत घळके सर, प्रसिद्धीप्रमुख योगेश शिंदे व मोठ्या प्रमाणावर सर्व मित्र परिवार उपस्थित होता. यावेळी अनेक तरुणांनी आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला. लवकरच शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला जाईल. सर्व पदाधिकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील राजकीय कारकिर्दी साठी शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा