*अकलूज बायपास दरम्यान होणार भूयारी मार्ग ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून हिरवा कंदील*
अकलूज : माळशिरस तालुक्यातून जाणार्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील अकलूज बायपास दरम्यान कि.मी 108-600 अकलूज-तांबवे रोडसाठी भूयारी मार्ग करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबई दौर्यावर असताना आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी त्यांची भेट घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या विविध कामाबाबत निवेदन दिले होते.
सदरच्या निवेदनाची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या आठवड्यात संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील महाळुंग बायपास येथील कि.मी 118 मधील भुयारी मार्ग हा चार मीटर ऐवजी पाच मीटर करण्यास मान्यता दिली आहे.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आता अकलूज बायपास दरम्यान निरा नदी जवळ अकलूज-तांबवे रोडसाठी भूयारी मार्ग करण्यासाठी सुध्दा नितीन गडकरी यांनी सहमती दर्शवली असून लवकरच सदरचे काम सुरू करण्यात येणार आहे. महाळुंग येथील पुलाची उंची वाढवण्यास मान्यता व आता अकलूज - तांबवे रोडसाठी भूयारी मार्ग मंजुर झाल्याबद्दल परिसरातील नागरीकांनी आनंद व्यक्त करून केंद्रीय रस्ते व वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांचे आभार मानले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा