MHT-CET परीक्षेत कै.विठ्ठलरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय.अंबाड या विद्यालयातील विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी
टेंभुर्णी/ प्रतिनिधी
सन-2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये झालेल्या MHT-CET या परीक्षेत कै.विठ्ठलरावजी शिंदे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय,अंबाड या विद्यालयातील आनंद मच्छिंद्र पाटील यांने 99.25% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला रजपूत पल्लवी संजयसिंग या विद्यार्थीनीने 97.85 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तसेच शेख वाहीत हसन 96.51 याने तृतीय क्रमांक व पाटील किरण रमेश याने 95.51टक्के गुण मिळवून चतुर्थ पटकावला.
या निकालामध्ये जीवशास्त्र 99.56, गणित 95.84, भौतिकशास्त्र 96.23, रसायनशास्त्र 99.61, विषयातील सर्वोच्च गुण मिळवून उज्वल यशाची परंपरा कायम राखली या विद्यार्थ्यांना पाटील एस.एन, तळे एम.एस, कांबळे बी.एल, देवकाते एस.व्ही या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.या घवघवीत यशाबद्दल माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माढा-करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय संजयमामा शिंदे,संस्थेचे सचिव तथा प्राचार्य ठोंबरे आर.ए व विद्यालयाचे प्राचार्य श्री.रजपूत जे.एन कन्हेरगांव शाळेचे मुख्याध्यापक अमोल लोंढे , माध्यमिक विभाग प्रमुख व पाटील एम एस ,ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख घाडगे व्ही एन ,यशवंत प्रायमरी स्कूल,अंबाड प्राचार्य होनमोटे एस.आर. व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा