रोटरी क्लब टेंभुर्णी यांच्याकडून 'राष्ट्र शिल्पकार' पुरस्काराचे दिमाखदार वितरण. अभियंते, फार्मासिस्ट, आयर्न मॅन, कॉम्रेड, यांचाही केला सन्मान.
टेंभुर्णी (प्रतिनिधी)रोटरी क्लब, टेंभुर्णी यांच्याकडून 'राष्ट्र शिल्पकार' पुरस्काराचे दिमाखदार वितरण करण्यात आले त्याच बरोबर अभियंता दिनाच्या निमित्ताने टेंभुर्णी मधील विशेष करून बांधकाम क्षेत्रात काम करणार अभियंते तसेच फार्मासिस्ट डे च्या निमित्ताने फार्मासिस्ट यांचाही सन्मान करण्यात आला
दिनांक 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता रोटरी हॉल टेंभुर्णी येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रोटरी डिस्ट्रीक्ट 31 32 चे माजी प्रांतपाल मोहन देशपांडे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक राजेंद्र दास सर हे होते. रोटरी इंटरनॅशनल यांच्याकडून दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्र शिल्पकार पुरस्काराने सन्मानित केले जाते यावर्षीही टेंभुर्णी व परिसरातील 12 उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष संदीप जाधव यांनी केले यामध्ये त्यांनी रोटरी क्लबचे सदर कार्यक्रम घेण्यामागचे प्रयोजन सांगितले तर प्रमुख अतिथी मोहन देशपांडे व राजेंद्र दास सर यांनीही शिक्षकांसाठी प्रेरक विचार व्यक्त केले टेंभुर्णी व परिसरातील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये आदर्श कार्य करणार्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये शितल पांडुरंग देवकर, शहाजी तुळशीराम लोंढे, शरद चंद्रकांत गवळी, समाधान तुकाराम अवताडे, तानाजी नारायण ढवळे, संगीता पिराजी शिंदे, सुनंदा विठ्ठल तळेकर, दत्तात्रय अर्जुन भालेराव जहांगीर जैनुद्दीन तांबोळी, वर्षा महारुद्र डोंगळे, दीपिका बाळासाहेब जाधव, प्रवीण वसुदेव काळे यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र ,शाल, फेटा देऊन सन्मान करण्यात आला त्याचबरोबर टेंभुर्णी शहरातील नामांकित अभियंते उद्योजक बाळासाहेब देशमुख व पारस कुमार जैन असिस्टंट मॅनेजर, जिंदाल लिमिटेड यांचाही रोटरी कडून 'शिल्पकार' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर अभियंता दिनाच्या निमित्ताने टेंभुर्णी मध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे अभियंते शिराज तांबोळी, सचिन देवडकर, सुजित बाबर, अमोल यादव, सचिन लामकाने,सागर लोंढे, सुरज देशमुख, अनिकेत कांबळे, सुजित बाबर, राहुल बागवाले यांचाही सन्मान करण्यात आला त्याचबरोबर टेंभुर्णी गावचे रहिवासी डॉक्टर सुहास रामचंद्र लोंढे यांनी फिटनेस क्षेत्रातील आयर्न मॅन हे मानांकन प्राप्त केले त्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला आयर्न मॅन हे मानांकन प्राप्त करण्यासाठी 3.8 किलोमीटर पोहणे 180 किलोमीटर सायकलिंग व 42 किलोमीटर रनिंग हे सलग करावे लागते डॉ. लोंढे यांनी कझाकिस्तान येथे 15. 5 तासात वरील उद्दिष्ट पूर्ण करून आयर्न मॅन हा किताब मिळवला तसेच सर्वात जुनी मॅरेथॉन कॉम्रेड ही 90 किलोमीटरची मॅरेथॉन दक्षिण आफ्रिका येथे पूर्ण केल्याबद्दल दादासो बबन सत्रे व रणजीत सावळे यांचाही सन्मान करण्यात आला
तसेच इनरव्हील क्लब कडून गौरी आरास स्पर्धेचे आयोजन केले होते त्याचे बक्षीस वितरण ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यामध्ये सौ.भामाबाई ढगे (प्रथम क्रमांक) सौ.सुषमा सचिन होदाडे (द्वितीय क्रमांक) सौ. सुनीता घाडगे( तृतीय क्रमांक) रूपाली येवले पाटील (उत्तेजनार्थ) यांना बक्षीस वितरण करण्यात आले याचबरोबर टेंभुर्णी मधील आदर्श गणेश मंडळ म्हणून प्रगती गणेश मंडळ. इंदिरानगर, श्रीमंत महादेव गल्ली गणेश मंडळ व कोष्टी गल्ली गणेश मंडळ यांचाही सन्मान करण्यात आला तसेच रोटरी क्लब टेंभुर्णी कडून विद्यार्थिनींसाठी सायकल बँक हा उपक्रम चालू केला असून जनता विद्यालय टेंभुर्णी येथील नऊ विद्यार्थिनींना सायकलीचे मोफत वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी रोटरीचे सचिव किशोर सलगर तसेच रमेश पाटील नागेश बोबडे,यशवंत हांडे,श्रीकांत लोंढे,डॉ. पांडुरंग गायकवाड, अनिल बाबर अनिल मस्के, दीपक व्यवहारे पारस कटारिया योगेश भणगे, महेश कोठारी बाळासाहेब सपाटे ,शब्बीर जागीरदार, तनवीर मुलाणी विरांग मेहता ,किशोर तळेकर, आदी उपस्थित होते तर इनरव्हील क्लबच्या स्वराली बोबडे, जयश्री ताबे, वैशाली शिंदे आदी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन होदाडे, संदीप मोकाशी यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा