Breaking

सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

श्रीगोंदा वि.का.स.से. सोसायटीच्या सभासदांना दिवाळीपूर्वी ११ टक्के लाभांश वाटप केले जाणार-अध्यक्ष अशोक बाजीराव आळेकर



*श्रीगोंदा वि.का.स.से. सोसायटीच्या  सभासदांना दिवाळीपूर्वी ११ टक्के लाभांश वाटप केले जाणार  -अध्यक्ष  अशोक बाजीराव आळेकर 




  श्रीगोंदा प्रतिनिधी/ संस्थेचे सन२०२१-२०२२सालाचा लेखाजोखा/अहवाल संस्थेचे सचिव श्री राजूशेठ सिदनकर यांनी मांडला.विपयपत्रिकेवरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली ,

         यांमध्ये प्रामुख्याने नवीन इमारत बांधकाम सुरू करणे, नवीन इमारतीमधील हाॅलला सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी सभागृह नाव देण्ययाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
     यावेळी संस्थेचे अध्यक्ष  अशोक बाजीराव आळेकर यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.तसेच सभासदांना दिवाळीपूर्वी ११ टक्के लाभांश वाटप केले जाणार आहे तसेच संस्थेच्या नवीन इमारतीचे भुमीपुजनाची तारीख लवकरच ठरवली जाईल असे सांगितले.
      तसेच संस्थेचेचा कारभार पारदर्शी व काटकसरीने व्यवहार केला जातो, दहा नव्या पैशाचा भ्रष्टाचार केला जात नाही हे छातीठोकपणे सांगू शकतो असे प्रतिपादन केले.
    यावेळी नगरसेवक  प्रशांत गोरे यांनी  संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी तुळशिदास मंगल कार्यालय मोफत दिल्या बद्दल संस्थेच्या वतीने  शिवसेना तालुकाप्रमुख(शिंदे गट),मा. संचालक नंदकुमार तांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
          याप्रसंगी माजी नगरसेवक दादासाहेब औटी,शिवाजी शेळके,एकनाथराव आळेकर,भिमराव आंनदकर सर, भाऊसाहेब खेतमाळीस, मोहनराव डांगरे, संभाजी ब्रिगेडचे  नानासाहेब शिंदे,दादासाहेब खेतमाळीस,नंदकुमार ताडे, नगरसेवक सतिष मखरे, ज्ञानदेव शिरवाळै, प्रशांत गोरे, बापुराव सिदनकर, संस्थेचे व्हा चेअरमन श्री सुदामराव दांडेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 
     संस्थेचे संचालक मारूती उर्फ बाबू शेठ बोडखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
  यावेळी  बापुराव औटी,तुपे गुरुजी, सर्जेराव शिंदे, नामदेव औटी,देवराम कोथिंबीरे, बबनराव सातव, मारूती खेतमाळीस सखाराम गांजुरे. 
  तसेच संस्थेचे संचालक  पोपटराव बोरूडे, संजय मखरे, सखाराम औटी, हनुमंत उदमले, अनिल नन्नवरे,प्रदीप औटी, सुभाषराव बोरुडे,पोपट कोथिंबीरे आणि संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा