Breaking

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

प्रा शंकर शिंदे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश



प्रा शंकर शिंदे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश





पिलीव प्रतिनिधी/ प्रमोद भैस


माळशिरस तालुक्यातील पिलीव भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते प्रा शंकर शिंदे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथे मातोश्री वर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार सुभाष देसाई,माजी मंत्री चंद्रकांत खैरे,प्रा लक्ष्मण हाके,आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे  विशेष शिवबंधन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हातात बांधून अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रा शंकर शिंदे यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील  इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले
तसेच सोलापूर जिल्ह्यातील,व माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी व युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व जिल्ह्यातील जेष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तेथे शाखा काढून शिवसेना वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले सोलापूर जिल्ह्यातील व माळशिरस तालुक्यातील अनेक माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व अनेक कार्यकर्ते तसेच इतर अनेकपक्षांचे नेते पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा