Breaking

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

कलबुर्गी व्हाया कुर्डुवाडी कोल्हापूर नवीन रेल्वेचे सोलापूर जिल्हा प्रवाशी संघातर्फे जंगी स्वागत... नवीन गाडीने पश्चिम महाराष्ट्र दक्षिण भारतास जोडल्याने प्रवाशात आनंद


कलबुर्गी व्हाया कुर्डुवाडी कोल्हापूर नवीन रेल्वेचे सोलापूर जिल्हा प्रवाशी संघातर्फे जंगी स्वागत...

   नवीन गाडीने पश्चिम महाराष्ट्र दक्षिण भारतास जोडल्याने प्रवाशात आनंद



कुर्डुवाडी, प्रतिनिधी.आज पासून नव्याने सुरू झालेल्या कलबुर्गी व्हाया कुर्डुवाडी कोल्हापूर नवीन रेल्वेचे कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर सोलापूर जिल्हा प्रवाशी संघाचे वतीने जंगी स्वागत करण्यात आले.


           नवीन सजून अजून आलेल्या रेल्वेचे सोलापूर जिल्हा प्रवाशी संघाचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्वागत करण्यात आले.
     या गाडीचे इंजिन चालक तानाजी माने व डी.एल.पाटील यांना डॉ.आषिश रजपूत व अरुण कोरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.
    याप्रसंगी स्टेशन मुख्य प्रबंधक जानराव आर.ए.,सोलापूर जिल्हा प्रवाशी संघाचे अध्यक्ष हर्षद मोरे,उप प्रबंधक पाडुळे,माजी  उपनगराध्यक्ष दादासाहेब गोरे, डॉ.आषिश रजपूत,भाजप युवा तालुकाध्यक्ष सुधीर गाडेकर, व्यापारी सेलचे तालुका अध्यक्ष सुराणा, मुख्य वाणिज्य निरिक्षक आर.एस.भानवसे, मुख्य तिकिट निरिक्षक विजय चवरे, मुख्य टी.एम.सी युवराज बागल, इन्चार्ज गायकवाड एम.के.दर्शन काशीद आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मान्यवर, प्रवाशी संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.
   कोरोनो काळात गाड्या बंद झाले नंतर कर्नाटक ते पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी एकही रेल्वे नव्हती.याबाबत सोलापूर जिल्हा प्रवाशी संघाचे वतीने वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.अखेर आज ही गाडी सुरू झालेने कुर्डुवाडी मार्गे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण भारतास जोडल्याने प्रवाशात आनंद द्विगुणित झाला आहे.अनेक प्रवाशांकडून सोलापूर जिल्हा प्रवाशी संघाचं अभिनंदन करुन धन्यवाद देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा