Breaking

सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

भैरवनाथ शुगरचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न*



*भैरवनाथ शुगरचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न* 



        माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड आलेगाव युनिटचा गळीत हंगाम सन 2022 -23 या सातव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ भैरवनाथ शुगरचे चेअरमन तथा सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख मा.प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक 26/9/2022 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला 
      यावेळी प्रारंभी वडोली ग्रामपंचायत उपसरपंच तानाजी गाडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.गौरी गाडे,यांच्या हस्ते पूजा घालण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत,धाराशिव जि.प.उपाध्यक्ष धनंजय सावंत, कार्यकारी संचालक किरण सावंत, कार्यकारी संचालक केशव सावंत, कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत सूर्यकांत अप्पा शेंडगे, जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे,विनोद पाटील, जनरल मॅनेजर सुरेश पाटील पंढरीनाथ चंदनकर विनायक चंदनकर साधू हिवरे बाळासाहेब गाडे विकास गाडे भजनदास खटके शिवराज रोकडे विजय पवार बाळासाहेब खाडे संतोष ढवळे अरुण गाडे रोहन चव्हाण समाधान दास रामभाऊ टकले निवृत्ती तांबे भारत माने प्रोसेस जनरल मॅनेजर पोपट क्षीरसागर असिस्टंट जनरल मॅनेजर आबासाहेब वाघ चिफ अकौंटंट विठ्ठल काळे सुरक्षा अधिकारी शैलेश शिंदे शेती अधिकारी विजय खटके स्टोर कीपर सुधीर पाटील ऊस पुरवठा अधिकारी तानाजी कदम टाईम कीपर सुमित साळुंखे सिव्हिल विभाग प्रमुख राहूल खटके यांच्यासह उत्पादक शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असिस्टंट जनरल मॅनेजर आबासाहेब वाघ यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.
चौकट- मागील सिझन 2021-22 मधील गाळपास आलेल्या उसाचे 2200 रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाले असून उर्वरित 200 रुपये देणार असल्याचे सांगून कारखान्याला जोडणारे सर्व रस्ते डांबरीकरण करणार असल्याचे प्रतिपादन भैरवनाथ शुगरचे चेअरमन मा.प्रा. शिवाजीराव सावंत यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा