बबनरावजी शिंदे विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शननात यश
कन्हेरगाव (प्रतिनिधी)
अकोले(खु)ता.माढा येथील मा.बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्य विद्यालयाचे ४९ व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शननात मोठ्या गटात सोहम बळीराम नलवडे प्रयोगाचे नाव,सेंद्रिय शेती. या प्रयोगास प्रथम क्रमांक मिळाला . तसेच अश्विनी संभाजी अनपट व प्रतिज्ञा रामेश्वर चौधरी प्रयोगाचे नाव बैलगाडीतील भूमिती या प्रयोगास उत्तेजनार्थ प्रमाणपत्र मिळाले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक विलास पवार, संभाजी अनपट,चौधरी सर,सतिश नागणे, कोरे सरयांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे आमदार बबनदादा शिंदे,संस्थेचे अध्यक्ष आमदार संजयमामा शिंदे, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संस्थेचे चेअरमन रणजित भैय्या शिंदे, सभापती विक्रमदादा शिंदे,माढा वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धनराज दादा शिंदे, निमगावचे सरपंच यशवंत भैय्या शिंदे, संस्थेचे सचिव तथा प्राचार्य राजेंद्र ठोंबरे सर, विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला, अंबाडचे प्राचार्य रजपूत सर, कै .विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला, कन्हेरगाव चे मुख्याध्यापक अमोल लोंढे व मुख्याध्यापिका मधुरा सुरवसे मॅडम यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा