श्रीगोंद्यात शिवसेना-ठाकरे गटाने लावला भव्य शाखा उद्घाटनावर जोर....
श्रीगोंदा-नितीन रोही,
सविस्तर असे कि शिवसेना -युवा सेनेच्या भव्य शाखा उद्घाटन
श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी मध्ये धूम धडाक्यात संपन्न झाले.
तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या नावलैगिक मिळालेल्या वडाळी गावांमध्ये शिवसेनेची भव्यदिव्य शाखा उद्घाटन आज रविवार दिनांक ११/९/२०२ रोजी झाली.
राज्यामध्ये अनेक आमदार खासदार शिवसेनेशी गद्दारी करून गद्दार गटात जात असताना श्रीगोंदा तालुक्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी शिवसेनेत सामील होऊन शिवसैनिकांची ताकद वाढवत आहे, तालुक्यामध्ये गद्दार गटाला कुठल्याही प्रकारचा थारा श्रीगोंदा तालुक्यातील जनता देत नसून उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीमागे जनता ठामपणे उभी राहत आहे,हेच यावरून दिसून येत आहे तुम्ही गद्दारी करून आमदार,खासदार फोडून मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळू शकतात पण जनतेच्या मनामध्ये तुम्हाला काडीमात्र किंमत नाही हे यावरून दिसत आहे.असे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे यांनी म्हटले आहे.शाखेचे उद्घाटन तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या शुभहस्ते झाले. वडाळी शिवसेना शाखा संपर्क कार्यालय शाखा संघटक दिगंबर बायकर यांच्या जागेमध्ये सुरू करण्यात आले, या शाखेसाठी उपतालुकाप्रमुख रावसाहेब डांगे यांच्या सह त्यांच्या मित्रांनी परिश्रम घेतले.
यावेळी सुरेश देशमुख ,संतोष खेतमाळीस,चंद्रकांत धोत्रे, शरद नागवडे,गणेश लाटे,रघुनाथ सपकाळ, सौ.नूतनताई पानसरे, श्रीराम मस्के,ओमकार शिंदे, संभाजी घोडके,रोहिदास मस्के, नितीन लोखंडे,जमील भाई शेख, भीमराव भिसे, दादाराव मस्के, तालुक्यातून खूप मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी शिवसेनेच्या शाखाप्रमुख पदी दिलीप डांगे, उपशाखाप्रमुख प्रदीप शिंदे, कुंडलिक बायकर, शाखा संघटक दिगंबर बायकर, खजिनदार दामोदर शिंदे,शाखा सचिव बाळासाहेब शिंदे, युवा सेना शाखा प्रमुख पदी भास्कर वागस्कर,उपशाखाप्रमुख पदी रवींद्र गाडे, शिवाजी ससाने, शाखा संघटक पदी विकास जाधव शाखा,उपसंघटक पदी बाळासाहेब शिंदे वरील सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा