Breaking

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

विठ्ठलराव शिंदे कामगार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीचे वातावरणात संपन्न




विठ्ठलराव शिंदे कामगार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीचे वातावरणात संपन्न


बेंबळे।प्रतिनिधी।                          
 

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेची सन 2021-22 या आर्थिक वर्षाची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि.27 रोजी  कारखाना कार्यस्थळावर संस्थेचे  व्हाईस चेअरमन चीफ केमिस्ट अनिल जगताप यांच्या  अध्यक्षतेखाली खेळीमेळीचे वातावरणात संपन्न झाली.
                      मा.आ.बबनराव शिंदे  यांच्या  मार्गदर्शनाखाली व संस्थेचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांच्या अधिपत्याखाली संस्थेने केलेल्या प्रगतीचा आढावा संस्थेचे संचालक व केन मँनेजर संभाजी थिटे यांनी आपल्या  प्रास्ताविकामध्ये मांडला. त्यानंतर संस्थेचे सचिव उत्तम माळवदकर यांनी 14 व्या  वार्षिक सर्वसाधारण सभेचे विषय वाचन केले, त्यास  सभासदांनी सर्व विषयांना एकमताने  मंजूरी  दिली.
              संस्थेचे व्हाईस चेअरमन अनिल जगताप  उपस्थितांना सभासदांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ऑडीट ब वर्ग मिळालेला  आहे., तसेच सदर आर्थिक वर्षामध्ये संस्थेस 1 कोटी 16 लाख 68 हजार नफा झालेला  असून 10 टक्के लाभांश सभासदांना देण्यात आला  आहे.
             या वेळी संस्थेचे संचालक व कारखान्याचे मॅनेजमेंट डायरेक्टर   संतोष डिग्रजे यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी गौरवोद्गार काढून पतसंस्था नावारूपास येण्यासाठी  कामगार सभासद बंधूचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. पतसंस्थेच्या पुढील कामकाजामध्ये  सभासदांनी अशाचप्रकारे सहकार्य ठेवावे असे आवाहन  त्यांनी  केले.
            सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले, आभार संचालक पांडुरंग लोंढे यांनी मानले. सदर प्रसंगी कामगार पतसंस्थेचे सर्व संचालक, सभासद, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख व विभागप्रमुख उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा