गौराईंपुढे फराळाचा थाट आणि महिलांच्या आनंदाला उधाण
वडूज प्रतिनिधी
लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर शनिवारी घरोघरी गौराईचे आगमन झाले. महिलांनी मोठ्या उत्साहात गौराईचे स्वागत केले. आगमनाच्या दिवशी भाजी भाकरीचा नैवैद्य दाखविल्यानंतर रविवारी गौराईला पंचपक्वान्नाचा नैवैद्य अर्पण करून या दिवशी घरोघरी गौराईसमोर केलेली आकर्षक सजावट, विद्यूत रोषणाई, सामाजिक व पर्यावरणाचे संदेश देणारे देखावे पाहण्यासांठी महिलांची गर्दी दिसून येत होती. गौराई म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा सण असल्याने महिला वर्गाच्या आनंदाला उधाण आले होते.
भुरकवडी ता खटाव येथील सामाजिक कार्यकर्त्यां व राजकमल महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.आशाताई शरदराव कदम यांच्या निवासस्थानी दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर केले जातात. तसे याही वर्षी महालक्ष्मी देवीच्या वृताचा देखावा सादर करण्यात आला होता. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी महिलांचा हळदीकुंक लावण्याचा व उखाणे घेण्याचा कार्यक्रम ही मोठ्या प्रमाणात पार पडला. गौराईसमोर लाडू, चिवडा, करंजी, बर्फी, शंकरपाळी, फरसाणा, भाकरवडी, गुलाबजाम, सोनपापडी, म्हैसूरपाक, चकली, बालूशा, पाच प्रकारची फळे, डाळी, सर्व कडधान्ये आदि प्रकाराचे अनेक फराळाचे पदार्थ गौराईसमोर मांडण्यात आले होते. याबरोबर पुरणपोळीचा नैवैद्य अर्पण करण्यात आला. महिलांवर्गाकडून पारपांरिक पध्दतीने गौराईचा थाटमाट करताना आधुनिकतेचा साज चढविण्यात आला असून एलईडीच्या बल्बच्या माध्यमातून आकर्षक विद्यूत रोषणाई व अन्य सामाजिक आणि पर्यावरणावर आधारित देखावे सादर करण्याचा कल दिसून येत आहे.
फोटो -
वडूज - भुरकवडी ता खटाव येथे सौ. आशाताई कदम यांच्या निवासस्थानी गौराईसमोर केलेला महालक्ष्मी वृताचा देखावा.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा