Breaking

सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर येथे शिक्षकांच्या भूमिका साकारुन व मेलोड्रामातून विद्यार्थ्यांनी साजरा केला ‛शिक्षक दिन'*



*लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर येथे शिक्षकांच्या भूमिका साकारुन व मेलोड्रामातून विद्यार्थ्यांनी साजरा केला ‛शिक्षक दिन'* 


    टेंभुर्णी(प्रतिनिधी) श्री माऊली शिक्षण प्रसारक  समाज सेवा मंडळ संचलित लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज, टेंभुर्णी येथे ५ सप्टेंबर रोजी 'शिक्षक दिन' मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रशालेचे प्राचार्य राऊत सर, समन्वयक करळे सर य‍ांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, ज्ञानजोती सावित्रीबाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृाष्णन यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले

          प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारल्या. वर्गावरती जाऊन अध्यापन केले. शिक्षकांचे काम किती जबाबदारीचे असते हे समजून घेण्यात विद्यार्थी उत्सुक राहिले. यावेळी विद्यार्थ्यांनी आजच्या दिवसाचे महत्व व आलेला अनुभव आपल्या मनोगतातून कथन केला. बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आपले अनुभव मांडले व शिक्षक दिनाचे महत्व विषद केले.
        त्यानंतर कार्यक्रमात आनंदाबरोबरच डोळ्यात पाणी आणणारा नाट्यमयी कलाप्रकार सादर करण्यात आला. ज्यातून शिक्षकांचे सामाजिक व शेैक्षणिक योगदान, त्यांची विद्यार्थी घडावेत म्हणून असलेली तळमळ, समाजाची नवनिर्मिती करणारा घटक म्हणजे शिक्षक हे सर्व त्यातून सादर करण्यात आले. शिक्षकांसाठी मनोरंजक खेळाचे  आयोजन करण्यात आले होते. तसेच संस्थेच्या वतीने सर्व शिक्षकांना स्नेहपूर्वक भेटवस्तू देण्यात आल्या. 
              यावेळी संस्थेचे अध्यक्ष योगेशजी (बाबाराजे) बोबडे, सचिवा सौ.सूरजा बोबडे मॅडम यांनी सर्व शिक्षकांचे तोंडभरुन कौतुक केले व पुढील कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा