जामखेड तालुक्याची युवकाची श्रीगोंद्यात आत्महत्या...
श्रीगोंदा-नितीन रोही
शहरालगत असलेल्या आळेकर मळा येथील बेगर्स होम परिसराततीळ जुन्या इमारती मधील असलेल्या लिंबाच्या झाडाला श्री.ज्ञानेश्वर उर्फ प्रकाश मोहन ढवळे वय-25 रा-पिंपरखेड ता-जामखेड जि-अहमदनगर याचा नायलॉन दोरीच्या सह्यायाने लटकलेला मृतदेह आढळला. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. तर शव विच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आलेला आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नमूद युवक हा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जामखेड येथून श्रीगोंदा येथे आला होता. त्याचा मृतदेह मांडवगण रोडच्या शेजारी बेगर होम या जुन्या इमारती मध्ये लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळला. याबाबत संबंधितांनी पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यानुसार श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. याप्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद केली असल्याचे समजते.
अंत्यविधी पिंपरखेड येथील ढवळे वस्ती येथे राहत्या घरी आज शुक्रवारी सकाळी 8वाजता होणार असल्याचे समजते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा