Breaking

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये विविध स्पर्धांचेे आयोजन.


श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये विविध स्पर्धांचेे आयोजन.
श्री लक्ष्मणराव देशमुख (गुरुजी)बहुउद्देशीय सार्वजनिक संस्था संचलित , श्री शारदे गुरुकुल पब्लिक स्कूल टेंभुर्णी मध्ये शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी कथाकथन स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आलेले होते या या कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या प्रांगणामध्ये सकाळी ठीक दहा वाजता झाली यामध्ये इयत्ता पहिली पासून इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित इंग्रजी मधून कथा निवडलेल्या होत्या आपल्या अनुभवाला , आपल्या बोलण्याच्या पद्धतीला व हवाभावाला साजेशा अशा प्रकारे कथा विद्यार्थ्यांनी सर्व प्रशालेच्या समोर सादर केल्या यामध्ये प्रशिक्षक म्हणून स्कूलच्या प्रिन्सिपल शाहिदा पठाण मॅडम यांनी काम पाहिले  तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत कवळसकर मॅडम यांनी केले.         विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे  आणि कलागुणांना वाव देण्यासाठी प्रशालेने या स्पर्धेचे आयोजन केलेले होते तसेच इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.
             विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे विषय देऊन त्यांच्या विचारांना चालना देण्याच्या हेतूने या स्पर्धेच्या आयोजन प्रशालेने केलेले होते . यामध्येही सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम अशा प्रकारे आपले विचार मांडून छान निबंध लिहुन आपापल्या वर्ग शिक्षकांकडे जमा केले यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व विद्यार्थ्यांसमोर सत्कारही करण्यात आले विद्यार्थ्यांना  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व प्रशालेच्या शिक्षिका अंजली गवई मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची यशस्वी  सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा