Breaking

शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२

शिवसेना शिंदे गट जिल्हा उपप्रमुखपदी विनोद पाटील सोलापूर जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या निवडी जाहीर



शिवसेना शिंदे गट जिल्हा उपप्रमुखपदी विनोद पाटील 
सोलापूर जिल्हा शिवसेना शिंदे गटाच्या निवडी जाहीर 


सतिश काळे 
भिमानगर (प्रतिनिधी):- शिवसेना शिंदे गट उपजिल्हा प्रमुख विनोद नंदराव पाटील (अकोले खुर्द), माढा तालुका उपप्रमुख प्रताप साहेबराव खटके (तांबवे टें) व रोहन सुभाष चव्हाण (चव्हाणवाडी) यांच्या निवडी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात येथे करण्यात आल्या. 

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, आरोग्य मंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी या निवडी केल्या.

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष काम करणारा असून,शिवसेना पक्ष वाढविण्याचे व शिवसेनेचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करणार असल्याचे नूतन उपजिल्हाप्रमुख विनोद पाटील यांनी सांगितले. 

या निवडी बद्दल विविध सामाजिक संस्था, ग्रामपंचायती, मित्र परिवार यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

यावेळी मार्केट कमिटीचे संचालक संतोष पाटील, शंभू साठे, महेश पाटील, भजनदास खटके, विजय खटके, गणेश हांडे, भारत खूपसे, राजू तोडकर, तानाजी गाडे, एकनाथ पाटील, राहुल देवकर, सोमनाथ पाटील, दिगंबर पाटील, अतुल कवडे, तन्मय कंडरे, भरगंडे, गणेश भिसे, अण्णा राजगुरू, तात्या देशमुख, नागनाथ काळे, तेजस नवले, विनोद देशमुख, अकोले खुर्द, वेणेगाव, चव्हाणवाडी, तांबवे येथील अनेक युवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा