पुणे सोलापूर पॅसेंजर १५ सप्टेंबर पासून चालू होणार रेल्वे विभागाने दिली माहिती
करमाळा प्रतिनिधी सर्वसामान्यांची तसेच गरिबांचा रथ म्हणून ओळखली जाणारी सोलापूर पुणे पॅसेंजर ही येत्या 15 सप्टेंबर 2022 गुरुवार रोजी चालू होणार असल्याची अधिकृत माहिती रेल्वे विभागाने दिली आहे
सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी सदरची पॅसेंजर म्हणजे गरीब वर्गाला एक प्रकारची दिलासा देणारी रेल्वे गाडी आहे या पॅसेंजरने सर्वसामान्य गरीब वर्ग पुणे सोलापूर येथे प्रवास करतात गरिबांचा रथ म्हणून ओळखली जाणारी ही पॅसेंजर सेवा येत्या पंधरा सप्टेंबर पासून सुरू होणार असल्याने सर्वसामान्य प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा