Breaking

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

विठ्ठलराव शिंदे कारखान्यास नॅशनल फेडरेशन,नवी दिल्ली यांचेकडून देशपातळीवरील उच्चांकी गाळपाचा पुरस्कार जाहीर-



विठ्ठलराव शिंदे  कारखान्यास नॅशनल फेडरेशन,नवी दिल्ली यांचेकडून देशपातळीवरील उच्चांकी गाळपाचा पुरस्कार जाहीर-




बेंबळे।प्रतिनिधी।                  फोटो
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली  यांचेकडून युनिट नं.1 पिंपळनेर येथील सन 2021-22 गळीत हंगामातील उच्चांकी गाळपासाठी सहकार क्षेत्रातील प्रथक क्रमांकाचा उच्चांकी गाळपाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली  यांचेकडून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नं.1 पिंपळनेर येथील कारखान्याची सन 2021-22 गळीत हंगामातील उच्चांकी गाळपासाठी सहकार क्षेत्रातील प्रथम पुरस्कारासाठी निवड झालेली  आहे. गळीत हंगाम सन 2021-22 मध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे  युनिट नं.1 पिंपळनेर येथे 24 लाख 78 हजार 922 मे.टन ऊसाचे विक्रमी गाळप केलेले  आहे. कारखान्यास जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे चेअरमन आ. बबनराव शिंदे यांनी सर्व संचालक मंडळ, सभासद,ऊस पुरवठादार,तोडणी मजूर, कार्यकारी संचालक एस. एन. डिग्रज व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. सदर पुरस्काराचे वितरण  नोव्हेंबर मध्ये नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे.यापूर्वी कारखान्यास उच्चांकी गाळपासाठी देशपातळीवरील दोन वेळा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

 कारखान्यास यापूर्वी चाचणी व प्रथम गळीत हंगाम २००१-०२ मध्ये विक्रमी ऊस गळीताबद्दल प्रथम क्रमांक, सन २००७-०८ मध्ये उत्तम आर्थिक व्यवस्थापनाबद्दल द्वितीय क्रमांक, २००३-०४, २००५-०६ व २००९-१० मध्ये उत्तम तांत्रिक कार्यक्षमता, सन २००६-०७ व २०१०-११ मध्ये सर्वोत्कृष्ट आसवनी,सन २०११-१२ मध्ये सर्वोत्कृष्ट उद्योजगता व उत्कृष्ट ऊस विकास, २०१२-१३मध्ये बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स, सन २०१३-१४ मध्ये साखर निर्यात, सन २०१५ मध्ये बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को. शुगर फॅक्टरी, सन २०१४-१५ मध्ये उच्चांकी ऊस गाळप, सन २०१५-१६ मध्ये साखर निर्यात,उत्तम तांत्रिक कार्यक्षमता, सर्वोत्कृष्ट आसवनी, सन २०१६-१७ मध्ये साखर निर्यात,सन २०१७-१८ मध्ये उच्चांकी ऊस गाळप, उत्कृष्ट ऊस विकास व्यवस्थापन, सन २०१८ मध्ये को-ऑपरेटीव्ह मेरीट अॅवॉर्ड, सन २०20-21 मध्ये साखर निर्यात, सर्वोत्कृष्ठ को जनरेशन प्लॅन्ट अशी राज्य व देशपातळीवरील एकूण 22 पारितोषिके प्राप्त झालेली आहेत.

कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ. बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट नं.1पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असल्याची माहिती व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा