*विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा अंतिम हप्ता प्रति टन 254/-रु. प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा - आ.बबनराव शिंदे*
बेंबळे।प्रतिनिधी। आ.बबनदादांचा फोटो
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने ऊस गाळप हंगाम 2021-22 मध्ये युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथे गाळप केलेल्या ऊसासाठी प्र.मे.टन रू.254/- प्रमाणे अंतिम हप्ता ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करणेत आला असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
विशेष वृत्तांत असा की गळीत हंगाम सन 2021-22 मध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर येथे 24 लाख 78 हजार 922 मे.टन ऊसाचे गाळप केलेली आहे. तसेच युनिट नं.2 करकंब येथे 6 लाख 55 हजार 564 मे.टन ऊसाचे गाळप केलेली आहे. दोन्ही युनिटचे मिळून 31 लाख 34 हजार मे.टनाचे देशामध्ये विक्रमी गाळप केलेले आहे. ऊस गाळप हंगाम 2021-22 साठी युनिट नं. 1 व 2 कडे गाळप झालेल्या ऊसास यापुर्वी प्र.मे.टन रू.2100/-प्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता, दुसरा हप्ता 250/-रु. प्रमाणे असे एकुण 2350 /- रु. प्रति टन अदा करण्यात आलेला आहे.
ऊस पुरवठादार शेतक-यांना दिवाळी सणासाठी अंतिम हप्ता 254 /-रु. प्रति टन प्रमाणे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आला आहे, असे एकुण प्रति टन 2604 /-रु. प्रमाणे पेमेंट ऊस पुरवठादारांना होत आहे. युनिट नं.1 व 2 कडे गाळप झालेल्या ऊसाचे अंतिम हप्त्या पोटी कारखान्याने 79 कोटी 61 लाख 59 हजार रूपये बँकेत वर्ग केलेले आहेत. ऊस गाळप हंगाम 2022-23 हंगामामध्ये दोन्ही युनिटकडे गाळपक्षमतेएवढा ऊसाचा पुरवठा होण्साठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा करार करणेची कार्यवाही सुरू आहे. तसेच ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांना पहिला व दुसरा ॲडव्हान्स हप्ता अदा करण्यात आलेला असून अंतिम हप्ता लवकरच अदा करणार आहे अशी माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा