*जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मंजूरी.*
*माढा विधानसभा मतदारसंघासाठी 28 कोटी 66 लाख निधी मंजूर -* आ.बबनदादा शिंदे
बेंबळे।प्रतिनिधी ..मुकुंद रामदासी
जल जीवन मिशन योजनेतून माढा तालुक्यातील 24 गावांना व माढा विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट पंढरपूर तालुक्यातील 3 व गावांना 28 कोटी 66 लाख 62 हजार रू. मंजूर झाले असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
माढा विधानसभा मतदारसंघातील माढा व पंढरपूर तालुक्यातील गावांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते . जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत निधी मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन मंजूरी मिळविण्यात आली आहे.
यामध्ये माढा तालुक्यातील 1) अकोल (बु) - रक्कम रु.1 कोटी 76 लाख 89 हजार 879 रुपये, 2) चव्हाणवाडी (टें) - 94 लाख 48 हजार 926 रुपये, 3) बुद्रुकवाडी - 48 लाख 29 हजार 639 रुपये, 4) पालवण - 41 लाख 46 हजार 692 रुपये, 5) सापटणे (टें) - 91 लाख 38 हजार 609 रुपये, 6) बावी - रक्कम रु. 81 लाख 48 हजार 573 रुपये, 7) अंजनगांव (उ) - रक्कम रु. 89 लाख 33 हजार 930 रु, 8) धानोरे - रक्कम रु. 73 लाख 76 हजार 011 रुपये, 9) जाधववाडी (मो) - रक्कम रु. 91 लाख 95 हजार 824 रुपये, 10) निमगाव (मा) - रक्कम रु. 78 लाख 97 हजार 562 रुपये, 11) वरवडे - रक्कम रु. 1 कोटी 49 लाख 29 हजार 749 रुपये, 12) लऊळ - रक्कम रु. 1 कोटी 86 लाख 80 हजार 941 रुपये, 13) पडसाळी - रक्कम रु. 77 लाख 04 हजार 173 रुपये, 14) जाधववाडी (मा) - रक्कम रु. 34 लाख 77 हजार 731 रुपये, 15) उपळाई (बु) - रक्कम रु. 1 कोटी 99 लाख 14 हजार 469 रुपये, 16) उपळाई (खु) - रक्कम रु. 1 कोटी 25 लाख 49 हजार 268 रुपये, 17) भुईंजे - रक्कम रु. 84 लाख 78 हजार 335 रुपये, 18) आहेरगांव - रक्कम रु. 79 लाख 40 हजार 748 रुपये, 19) बैरागवाडी - रक्कम रु. 66 लाख 80 हजार 711 रुपये, 20) रांझणी - रक्कम रु. 1 कोटी 48 लाख 37 हजार 079 रुपये, 21) अकुंभे - रक्कम रु. 89 लाख 45 हजार 120 रुपये, 22) वेताळवाडी - 73 लाख 89 हजार 977 रुपये, 23) अंजनगांव (खे) - रक्कम रु. 1 कोटी 68 लाख 93 हजार 769 रुपये, 24) खैराव - रक्कम रु. 1 कोटी 30 लाख 94 हजार 619 रुपये, तसेच पंढरपूर तालुक्यातील 1) सुगांव (भोसे) - रक्कम रु. 73 लाख 03 हजार 957 रुपये, 2) सुस्ते - रक्कम रु. 1 कोटी 99 लाख 75 हजार 699 रुपये, 3) आढीव - रक्कम रु. 1 कोटी 10 लाख 59 हजार 677 रुपये, असा एकूण 28 कोटी 66 लाख 62 हजार एवढा निधी मंजूर झाला असून लवकरच कामे सुर होणार असल्याचे आ. बबनदादा शिंदे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा