Breaking

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

संकल्प-आनंद फाउंडेशनचे वतीने सफाई कामगारांना साडी,कपड्यांची भाऊबिज भेट




संकल्प-आनंद फाउंडेशनचे वतीने  सफाई कामगारांना साडी,कपड्यांची  भाऊबिज  भेट


टेंभुर्णी ! प्रतिनिधी

टेंभूर्णी ता.माढा येथील माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींनी एकञ येऊन  स्थापन केलेल्या संकल्प-आनंद फाउंडेशनच्या वतीने  शहराची  स्वच्छता ठेवण्यात महत्वाची भूमीका बजावणा-या टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या सफाई  कामगारांना  सलग सहाव्या वर्षी कपडे व महिलांना साडी भेट  देऊन भाऊबीज भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. हा उपक्रम सलग सहाव्या वर्षी राबवला आहे.यामुळे  सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 


        यावेळी पुणे येथील प्रसिद्ध डॉक्टर  दत्तात्रय कोकाटे यांनी उपस्थित सफाई कामगारांना जीवन जगताना येत असलेल्या अडचणी वर कशी मात करावी व व्यसनापासून स्वतःने दुर रहावून आपल्या कुटुंबाला ही व्यसनापासून दूर ठेवल्यास आपली प्रगती होते.याबात  मार्गदर्शन केले.यावेळी भीमराव खुळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रज्जाक जमदार, बंडू कुंभार, मोहन कुटे, राहुल देशमुख, रुपेश बोबडे,  अस्लम शेख, अंबरनाथ खुळे, जीवन खरात, अण्णा कुंभार, संतोष नाळे, भजनदास गायकवाड, संतोष वाघमारे, बिटू केचे, प्रमोद जगताप आदिंनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन रज्जाक जमादार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा