सीना-माढा आणि आष्टी सिंचन योजनेच्या भूसंपादित क्षेत्रासाठी 36 कोटी 70 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार..... आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे। प्रतिनिधी
सीना-माढा आणि आष्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत नियमानुसार शेतकऱ्यांच्या संपादित करण्यात आलेल्या जमिनीसाठी शासनाकडून एकुण 36 कोटी 70 लाख रुपये उपलब्ध झाले असून उपजिल्हाधिकारी( प्रांत) कार्यालयामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे . लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर सदर रक्कम कायदेशीर पूर्तता होऊन मोबदला खात्यात रीतसर जमा होणार असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलेली आहे.
सविस्तर माहिती अशी की माढा तालुक्याची जलवरदाईनी ठरलेल्या सीनामाढा सिंचन योजनेसाठी अरण,पडसाळी ,जाधववाडी ,मोडनिंब, बैरागवाडी, लऊळ, व भुताष्टे या गावच्या महसूल हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी नियमित पद्धतीने भूसंपादन करण्यात आलेल्या आहेत व या संपादित क्षेत्रासाठी शासनाकडून 26 कोटी 80 लाख रुपये मोबदला निधी उपजिल्हाधिकारी (प्रांत) कार्यालयाकडे जमा झालेला आहे. तसेच मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी मोडनिंब व बैरागवाडी या महसूल गावच्या हद्दीतील नियम पद्धती नुसार संपादित झालेल्या जमीन क्षेत्रासाठी 9 कोटी 90 लाख रुपये मोबदला निधी प्रांत कार्यालयाकडे जमा झालेला आहे व या प्रमाणे एकूण 36 कोटी 70 लाख रुपये मोबदला निधी शासनाकडून उपलब्ध झालेला आहे. यानंतर रीतसर नियमित पद्धतीने भूसंपादन करण्यात आलेल्या क्षेत्राचे खरेदीखत होऊन त्याची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्याच्या मोबदला खात्यावर जमा होणार असल्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि आवर्जून सांगितले.
उपसा सिंचन योजनेसाठी भूसंपादित केलेल्या क्षेत्राचा मोबदला मिळण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला असून हे पैसे मिळणार असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा